पोस्ट्स

सोडून द्यायचं असतं

  सोडून द्यायचं असतं ....   सारं काही आलबेल सुरू असताना अचानक अनपेक्षित घडावं आणि आपण एकटे सामोरे जावं असंच काहीस आयुष्यात घडतं.....कधी ही कल्पना केली नाही असे अनुभव येतात.... दुःखाचा डोंगर जणू आपल्यावरच कोसळलाय का असा प्रश्न पडतो मग...... थोडक्यात काही marks नी result जाणं असो किंवा कुशलता असून हवी ती नोकरी न मिळणं असो मग....   आयुष्यात कधी मनासारखं घडतं तर कधी मनाविरुद्ध ... सारं काही अनिश्चित..... कधी वेळ तर कधी लोक....भेटलेली माणसं.... कधी कधी आपला भ्रमाचा भोपळा फोडण्यासाठी देव असे प्रसंग अन् अनुभव देतो तर कधी आपल्याला वेळोवेळी मार्गावर आणण्यासाठी. .... एखद्या गोष्टी बद्दल किंवा व्यक्ती बद्दल किती गृहीत धरून चालतो आपण..... मी असा अभ्यास केला तर यावेळी हवा तो result निश्चितच .. पण नंतर तोच काही मार्क्सनी गेला तर..??.. सारं काही पहिल्या पासून सुरुवात....फक्त फरक काय तो चुकांचा शोध अन् अनुभव गाठीशी...ही एक जमेची बाजू.... यश त्यानंतरचा आनंद आवडतोच प्रत्येकालाच.....पण मार्ग मात्र अपयश निराशा अन् परत नव्याने उभारी घेणं यातून जातो हे मात्र आपण विसरतो.....पाठीशी खंबीर अस...

सीमोल्लंघन

    सीमोल्लंघन जुने जाऊ द्या मरणालागुनि जाळूनी किंवा पुरुनी टाका सडत न एका ठायी ठाका सावध ऐका पुढल्या हाका खांद्यास चला खांदा भिडवूनी एक तुतारी द्या मज आणुनी...  केशवसुतांची ही कविता आज पुन्हा आठवणीत आली.... किती मार्मिक भाष्य......वास्तवात आणण्यासाठी प्रयत्नशील असणारे..... एरवी आनंदाच्या गप्पा मारणारे आपण मात्र एकटं असताना आयुष्यात आजवर घडलेल्या घटना, झालेल्या चुका, आलेले कठीण बरे- वाईट प्रसंग , नकारात्मक विचार अन् तश्या व्यक्ती कैक गोष्टींचे ओझं डोक्यावर अन् मनावर घेऊन फिरत असतो .. अन् त्यातून मिळत काय तर काहीच नाही......उलट होतो तो मनस्ताप..,चिंता, स्वतःवर येणारा राग , वाया घालवलेला/गेलेला वेळ....हे बघून जास्तच वाईट वाटत ...पण हे वाटणं स्वाभाविक साहजिक आहे... पण नुसत वाटून घेऊन परत तेच करायचं का?? तर नाही......जर झालेल्या चुका तुम्हाला समजल्या असतील तर त्यावर विचार केला वाईट वाटलं इथवरच न थांबता त्यावर काम करायला हवं..... म्हणजे परत त्या होऊ नये यासाठी..... नाहीतर होतं ते repeatation   of Cycles .... त्याचं गर्तेत अजून अडकत जातो आपण आणि साध्य काहीच नाही ...... म्ह...

आयुष्य जगताना....

  आयुष्य जगताना .......  " खूप काही करायचं होत कल्पनेतच राहून गेलं... वाटलं करावसं तर वयचं निघून गेलं...... आहे तस जगण्यावाचून काय आहे आता हाती पश्चात्ताप होतोय आता जबाबदाऱ्या बघू की स्वप्न साकारू.... स्वप्न हे स्वप्नच राहील आता".....,  अशी वेळ येऊ द्यायची नसेल तर आता जे करायचं आहे ते आताच करा.....तुम्ही उमेदीच्या कोणत्याही वयात असा त्यातसुरुवात  करा......एका दिवसात यश मिळत नाही ...वर्षे  लागतात हवं ते मिळवायला....पण सुरुवात करून हळूहळू स्वतः मध्ये आणि आहे त्या कामात study मध्ये improvement हवी तर स्वप्न पूर्ण करता येईल... नाहीतर उतार वयात पश्चातपा शिवाय हाती काही नाही .... आता वय आहे संधी आहे आणि सोबती असणाऱ्यांचा support ही.....मग विचार कसला..... जे करायचं ते आजच.... कारण उद्या कधीच नसतो....तो फक्त 'आज'च असतो... भूतकाळात गेला की 'काल'... काही ही करताना Result काय असेल माहिती नसतं पण स्वतःवर विश्वास ठेवून आपण करत असतो की नाही ...यशस्वी होणारे हेच करतात... ' कर्म करत चल ',फळाची अपेक्षा नको'....आपली 'भगवद्गीता'  हेच सांगते ना..... पण ठाम अस...

पळवाटा अनिश्चितता आणि आयुष्य

  पळवाटा अनिश्चितता आणि आयुष्य ठरवेल तसंच होईल असं  आयुष्य म्हणजे परिपूर्णच म्हणावं लागेल...... आयुष्यात कित्येकदा ठरवलेल्या गोष्टी, काम सोडून.., न ठरवलेल्याच गोष्टी घडताना दिसतात..... याच  एक कारण की सगळंच आपल्या हातात नसतं...नियतीला काही वेगळचं मान्य असतं.... तुमच्याकडून ते व्हावं ही अपेक्षा..... अन् दुसरं म्हणजे जे करायचंय त्याला दिशा नसणं ,त्याबद्दलची स्पष्टता नसणं....,धाडसाने सामोरे जाण्याची तयारी नसणं आणि अपयश पचविण्याची ताकद कमी पडणं...... यामुळेच माणूस पळवाटा शोधतो.... पण याने  योग्य तो मार्ग भेटत नाही तर माणूस पर्याय शोधतो.... अंतिम ध्येयापर्यंत पोहोचणं दूर... नुसतं भटकत राहतो....,  कौशल्य असून ही जीर्ण झालेल्या अडगळीत पडलेल्या पुस्तकासारखं वाटतो मग....., अस्तित्व टिकविण्याची धडपड सुरू असते...., स्वतःची ओळख निर्माण करण्याची गरज वाटू लागते.., आपल्यावर विश्वास ठेवणारे , पाठीवर हात ठेवून लढ म्हणणाऱ्यांची प्रतिमा उजळ कशी होईल याचा प्रयत्न केला जातो........, डोळ्यांच्या कडा पाणावलेल्या असतात अन् पुढचं सारं काही धूसर होतं......, जगावं तर कसं जगावं हा प्रश्न प...

किंमत

                    किंमत काही गोष्टी शिकण्यासाठी खूप मोठी किंमत मोजावी लागते....  असं म्हणतात देव आपली परिस्थिती बदलत नाही कारण त्याला आपली मनस्थिती बदलायची असते... पण मनःस्थितीच नाही बदलली तर?  त्याच सवयी असतील तर? माहिती असून ही त्याच त्याच चुका करत असू तर??  तर मग repitation of cycles ....   म्हणूनच कधी कधी देव मनःस्थिती बदलायला परिस्थिती बदलव तो .....जेणेकरून तुम्ही स्वतः ला आतून change करायला हवं....बाहेरचा दिखावा काय कामाचा?....तुम्ही लोकांना फसवू शकता पण स्वतः च काय? स्वतःशी प्रामाणिक असावं माणसानं मग दुसऱ्यांशी ....  आयुष्यात काय करावं कसं करावं कधी करावं..हे सगळं आपल्यालाच बघायचं असतं ..... नाही तर आयुष्य संपत नाही म्हणून जगणारे ही आहेत.....मरण येत नाही म्हणून आणि आलोय जन्माला म्हणून दिवस काढणाऱ्यांची कमी नाही...आणि success भेटत नाही म्हणून हार मानणाऱ्यांचीही कमी नाही...आपण त्यातले कोण हे बघणं जरुरी.....   प्रेमात risk घेणाऱ्याला आपल्याकडे मोठं समजतात त्यात arrange marriage करणाऱ्यांच ही...

जगणं आणि बरंच काही.....

  जगणं आणि बरंच काही..... आयुष्यात सारं काही मनासारखं घडेलंच असं नाही... काही अचानक आलेल्या बदलांना ही  सामोरं जावं लागतं...,  तसचं अचानक आलेल्या माणसांना ही ओळखून घ्यावं लागतं..... आयुष्यात येणारी माणसं आणि  परिस्थिती काही सांगून येत नाही.....आणि ती कशी हे वेळ आल्यावरच समजत ....   आजच्या काळात खरंच आपलं कोण आणि आपलं आहे असं दाखवणार कोण हे वेळेवर समजणं गरजेचं.....वयानुसार हे  समजेलच असं नाही पण सदविवेकबुद्धी जागृत असेल तर लवकर ज्ञात होत असावं..... आयुष्यात मार्ग काढत निघालेल्या व्यक्तीला परिस्थितीच ओझ काय कमी असतं म्हणून हे माणसांचं ही.....पण चांगली लोक आहेत म्हणून जगण्याला अर्थ ही आहे अन् आपल्या गुणांना ही....आणि संतांनी म्हंटलच आहे,"निंदकाचे घर असावे शेजारी".... असो, जीवनात अनेकवेळा मनाविरुद्ध घडतं....हवं तेव्हा हवी ती परिस्थिती आणि माणसं सोबत असतीलच असं नाही अश्यावेळी अनपेक्षित बदलांशी जुळवून घेणे तेवढंच महत्त्वाचं..... त्यात जर असे बदल ध्येयाच्या मार्गात येणारे असेल तर  accept it & live it ....Or leave it .... I mean to say,  Either change...