पोस्ट्स

डिसेंबर, २०२३ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

स्वप्न आणि आपण

              स्वप्न आणि आपण  असं म्हणतात , स्वप्न पूर्ण होतात म्हणून ती पहिली जातात..., पण पहिली जाणारी सगळीच स्वप्न कुठं पूर्ण होतात..?!.. काही पूर्ण होतात तर काही कल्पनेतच...... पण त्याच काही स्वप्नांना सत्यात उतरवताना नाकीनऊ येतं ...  खरं तर , एक वेळ अशी येते की आपली स्वप्ने ही केवळ आपली न राहता नाहीत ती आपल्या  कुटुंबाची आणि जवळच्यांची होऊन जातात...... तिथवर सारं काही ठीक .., पण ध्येयाच्या जवळपास पोहचायला अवधी बाकी असतानाच परत सारं काही पूर्ववत झालं तर??  जैसे थे! परत शुण्यापासून सुरूवात..... अशावेळी भीती वाटायला सुरुवात होते...., दडपण येऊ लागतं...  वेळ रेतीसारखा हातातून निसटून जातोय आणि आपण आहे तिथेच... आयुष्य थांबलंय की काय असं वाटतं... स्वतःवर ठेवलेला विश्वास जणू डळमळीत होऊ लागतो... ते म्हणतात ना self daubt तसं काहीसं...... आजवरचा सारा प्रवास डोळ्यासमोर तरळू लागतो....  यश अपयशाची गोळाबेरीज होऊ लागते.... आपण योग्य दिशेने जात आहोत की नाही आपले त्या मार्गाने प्रयत्न सुरू आहेत की नाही हे पाहणं जरुरीचं असतं तेही वेळोवेळ...