विश्वास .... विश्वास..... किती लहान शब्द आहेना...पण या एका शब्दात जुनी नवी सारी नाती आयुष्यभर जपली जातात.... विश्वास....नावाला शब्द...पण कमावयला अख्खं आयुष्य ही अपूरं पडतं अन् गमावायला एक क्षण ही पुरेसा असतो ... पण विश्वास आहे म्हणून तर नात्यात प्रेमाची,आपलेपणाची घट्ट नीव आहे जणू...मग ते नात कोणतं ही असो... आई वडील बहीण भाऊ पासून ते मैत्री प्रेम आयुष्यभरासाठीचा जोडीदार, आपलं काम, career मध्ये इथपासून ते शेवटच्या श्वासापर्यंत विश्वासाने जोडलेली माणसं.... आयुष्याच्या या प्रवासात अनेक लोक भेटतात... कधी विश्वासाने जवळ येतात अन् तेच विश्वास गमावला की तीच लोक अगदी अनोळखी होतात....पण यातून एक मात्र चांगलं होतं म्हणा...माणसं ओळखायला आपण वेळीच शिकतो...अन् परत चूक करताना स्वतः लाच सावरतो...काही गोष्टी अन् व्यक्ती वेळीच सोडून द्यावा लागतात काही मनात न ठेवता...आयुष्य अजुन सोपं होतं मग जगताना.. विश्वास अन् अनुभव मला एकाच नाण्याच्या दोन बाजू वाटतात...नवनवीन गोष्टी शिकण्यास प्रवृत्त करतात अन् आहे त्या गोष्टी अन् व्यक्ती जोडून ठेवयला ही मदत करतात.... विश्वास प्रत्येकवेळी...