सोडून द्यायचं असतं
सोडून द्यायचं असतं....
दुःखाचा डोंगर जणू आपल्यावरच कोसळलाय का असा प्रश्न पडतो मग......
थोडक्यात काही marks नी result जाणं असो किंवा कुशलता असून हवी ती नोकरी न मिळणं असो मग....आयुष्यात कधी मनासारखं घडतं तर कधी मनाविरुद्ध ...
सारं काही अनिश्चित.....
कधी वेळ तर कधी लोक....भेटलेली माणसं....
कधी कधी आपला भ्रमाचा भोपळा फोडण्यासाठी देव असे प्रसंग अन् अनुभव देतो तर कधी आपल्याला वेळोवेळी मार्गावर आणण्यासाठी.....
एखद्या गोष्टी बद्दल किंवा व्यक्ती बद्दल किती गृहीत धरून चालतो आपण.....
मी असा अभ्यास केला तर यावेळी हवा तो result निश्चितच ..
पण नंतर तोच काही मार्क्सनी गेला तर..??..
सारं काही पहिल्या पासून सुरुवात....फक्त फरक काय तो चुकांचा शोध अन् अनुभव गाठीशी...ही एक जमेची बाजू....
यश त्यानंतरचा आनंद आवडतोच प्रत्येकालाच.....पण मार्ग मात्र अपयश निराशा अन् परत नव्याने उभारी घेणं यातून जातो हे मात्र आपण विसरतो.....पाठीशी खंबीर असणाऱ्या हाताना कधी कधी खरचं विसरतो आपण?...का?......किती granted घेऊन चाललेलो असतो आपण......थकवा त्यांच्या पायाला ही आहे...अन् आपण?
असं वाटतं कधी कधी भरकटलेलो असतो आपण या दुनियादारीत......आपण काय करायला हवं यापेक्षा बाहेरच्या जगात काय चाललय यावर लक्ष केंद्रित करतो...
आयुष्यात निराशा येते ,नकारात्मक असणारे, बोलणारे लोक सामोरं येतात आपलं mindest बिघडवू पाहतात पण अश्यावेळी अशी लोक आणि त्यांच्या गोष्टी accept न करणं हे आपल्या हातात असतं, काय घ्यायचं काय सोडायचं हे पूर्णपणे आपल्या हातात असतं....पण खरंच हे करतो का आपण?किती वेळ वाया घालवतो मग अश्या वेळी.......हे पूर्णतः चुकीचं आहे अन् specially त्यावेळी ज्यावेळी तुम्ही already time limit मध्ये असाल....कळून हि न कळल्यागत वागणं म्हणजे स्पर्धेतून बाहेर फेकल्या सारखं आहे.....मग इतकं स्वतः च स्वतः वर control असू नये? Offcourse हवं ......ज्या गोष्टी, व्यक्ती येणारे प्रसंग आपल्याला महत्वाच्या नाहीत त्या सगळ्यांचं ओझं मनावर का घ्यायचं?असं ओझं येऊ न देणं म्हणजे खरंच isolated जगणं होय ... अपेक्षित result कडे एक पाऊल पुढे जाण्यासारखे आहे......खर तर सगळ्यात आधी आपली स्वतःची स्वतः शी स्पर्धा असावी, काल पेक्षा आज मी काय better केलं अन् जे केलं त्यातून माझा result कसा येऊ शकतं हे महत्त्वाचं आहे....
ना की कोण काय बोलतय, कोण काय बोलून गेलं and so on.....आयुष्यात जो तो ज्याच्या त्याच्या संस्कार आणि जीवनमूल्ये विचार आणि आजूबाजूच्या समाजातील जडणघडण प्रसंग यामुळे वागत असतो, बोलत असतो.....पण ते आपल्याला किती imp?आपलं काय?खरंच हे isolation आहे??हे sacrifices? अजिबात नाही.....
आयुष्यात एक phase अशी नक्की येते की या सगळ्याचा विचार करायला ही वेळ नसतो.....
Time जात असतं पटकन समजत ही नाही आणि आपण मात्र pre mains result मध्येच अडकून असतो मग अजून विचार करायला वेळ तर कुठंय?...
आणि त्यात भर म्हणून असे लोक आणि प्रसंग......पण अश्यावेळी गरजेचं असतं शांत राहणं...... Control The Controllable म्हणायचं अन् पुढं जायचं...
Exams होत राहणार आणि आपल्याला हवा तो आपला result ही......
पण या दरम्यान जे करायचं ते आपल्याच.... मार्गात अडथळा वाटणारं जे काही असेल ते सगळं वेळीच let go करायचं....
खरचं वेळेवरच सोडून द्यायचं असतं......
Then you will get distractionless mind...
And we all know that distractionfree mind is always Focused mind ....so Be focused.....
List is waiting for you......
धन्यवाद ,
लेखन ✍️© - Sayali S M
💯💯 बरोबर आहे ह्याच phase mdhun jat asto youth joprynt settle nahi hot .
उत्तर द्याहटवाRight......thank you 😊
हटवा