पोस्ट्स

फेब्रुवारी, २०२२ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

बदलांच्या वळणावर.....

  बदलांच्या वळणावर ...... आयुष्य बदललेल आपल्याला बघायचं असतं , अनुभवायचं असतं ,आपल्याला बदलायच मात्र नसतं....  असं म्हणतात  बदल अशी गोष्ट आहे की आयुष्यात कायम स्थिर आहे.., आपण बदलेना की निसर्ग किंवा नियती ते बरोबर घडवून आणते आपल्यात आणि परिस्थितीत ही.... मनाला आणि माणसाला एकांतात बसलं की काय चुकत कुठं चुकत हे बघायला चांगलं जमतं....,नाहीतर एरवी माणूस स्वतचं कमी अन् दुसऱ्याच्या चुका आणि गोष्टी यातच जास्त लक्ष देत असतो... आयुष्य थांबल्या सारखं वाटतं असलं तरी बदल हे सुरूच असतात आपल्याला त्या वेळेप्रमाणे बदलायच आहे हेच जणू ते सांगत असतात... काळाच्या ओघात हे खूप काही शिकवून मात्र जातात., आपल्याला घडवून जातात... मनाला आणि माणसाला ते accepted नसतं कारण  काही बदल मनासारखे असतात तर काही मनाविरुद्ध .... जे चाललय तेच चालत राहावं असं वाटतं  आणि असं असतानाच बदल स्वीकारायलाही तयार व्हावं लागतं.., पण हे खरचं आहे  नाहीतर मग आहे त्याच गोष्टी repeated घडतात आणि मग तेच चक्र.... So.., If  You Want to Change in Your life then You have to change yourself  first ..,Chang...

जगणं आणि बरंच काही...

    जगणं आणि बरंच काही .... आठवणीं आणि भावना यांचा खेळ काय तो निराळाच ... आठवणींचा डोंब मनात उसळला की विचार आणि भावनांची गुंफण होवू लागते....आठवणी नेहमीच चांगल्या किंवा हव्या हव्याशा असतीलच असं नाही....कधी कधी त्या संमिश्र ही असतात...कधी चेहऱ्यावर स्मित हास्य आणतात तर कधी पापण्या पाणवतात...... कधी स्वतःच  स्वतःच कौतक करायला भाग पाडतात तर कधी आपण अस का केलं म्हणून स्वतःवर राग आणायचं काम करतात......काही ही असली तरी आठवणी या आपल्या सावलीसारख्या आपल्या सोबत असतात.....आयुष्याच्या flash back मध्ये तर त्याच घेऊन जातात....पण त्यांना कसं घ्यायचं..,म्हणजे positive way ने घेऊन आनंदी राहायचं, झालेल्या गोष्टींपासून काय सुधार करता येईल हे बघायचं की त्यातच अडकून रहायचं हे सगळं आपल्यावरच..... चुकांचा, विचारांचा आणि आपल्याकडे आता काय नाही त्याचा अतिरेक न करता सद्य परिस्थितीत काय करता येईल  हे बघणं खूपच गरजेचं ....नाहीतर मग मानसिक त्रास आणि निराशेची गर्ता यायला ही वेळ नाही लागत...आपल्या अवतीभोवती हेच बघतो आपण.., अगदी आपल्या आयुष्यात ही...... कारण कधी कधी मन हे चांगल्या गोष्टीं पेक्षा ...