सीमोल्लंघन

 

  सीमोल्लंघन

जुने जाऊ द्या मरणालागुनि
जाळूनी किंवा पुरुनी टाका
सडत न एका ठायी ठाका
सावध ऐका पुढल्या हाका
खांद्यास चला खांदा भिडवूनी
एक तुतारी द्या मज आणुनी...

 केशवसुतांची ही कविता आज पुन्हा आठवणीत आली.... किती मार्मिक भाष्य......वास्तवात आणण्यासाठी प्रयत्नशील असणारे.....

एरवी आनंदाच्या गप्पा मारणारे आपण मात्र एकटं असताना आयुष्यात आजवर घडलेल्या घटना, झालेल्या चुका, आलेले कठीण बरे- वाईट प्रसंग , नकारात्मक विचार अन् तश्या व्यक्ती कैक गोष्टींचे ओझं डोक्यावर अन् मनावर घेऊन फिरत असतो ..
अन् त्यातून मिळत काय तर काहीच नाही......उलट होतो तो मनस्ताप..,चिंता, स्वतःवर येणारा राग , वाया घालवलेला/गेलेला वेळ....हे बघून जास्तच वाईट वाटत ...पण हे वाटणं स्वाभाविक साहजिक आहे...
पण नुसत वाटून घेऊन परत तेच करायचं का??
तर नाही......जर झालेल्या चुका तुम्हाला समजल्या असतील तर त्यावर विचार केला वाईट वाटलं इथवरच न थांबता त्यावर काम करायला हवं..... म्हणजे परत त्या होऊ नये यासाठी.....
नाहीतर होतं ते repeatation
 of Cycles ....
त्याचं गर्तेत अजून अडकत जातो आपण आणि साध्य काहीच नाही ......म्हणूनच आज  'सीमोल्लंघन' दिवशी  आपल्या यशाच्या मार्गात अडथळा बनून येणाऱ्या अडचणी, दुर्गुण,
नकारात्मक गोष्टी अन् तश्या व्यक्ती या सगळ्या गोष्टी सोडून पुढं जाऊया...
एका नव्या अध्यायाची सुरुवात करुया.....

सर्वांना दसऱ्याच्या मनःपूर्वक शुभेच्छा💐💐💐

धन्यवाद 😊,

#केशवसुत कविता 
#आयुष्य 🌱

Writing©✍️- Sayali S M 


© Copyright 


टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

ही वेबसाईट कोणत्याही विषयावर,जाती लिंग वर्ण धर्म पंथ अथवा व्यक्ती यावर आक्रमक पवित्रा घेऊन टीका टिप्पणी करण्यासाठी नाही....इथे आपले विचार स्पष्टपणे अन् तार्किक पद्धतीने मांडले जातात (संविधान अनुच्छेद १९(१)) ....सारासार विचार करून आपल्या जीवनात काही चांगला प्रभाव पडत असेल तर उत्तमच...ही खाजगी ब्लॉग साइट आहे याची नोंद घ्यावी इथे कोणतीही स्पॅम comments करु नये धन्यवाद 🙏

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आयुष्य आणि बरंच काही...

स्वप्न आणि आपण

निराशा आणि आयुष्य.....