पोस्ट्स

जुलै, २०२२ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

पळवाटा अनिश्चितता आणि आयुष्य

  पळवाटा अनिश्चितता आणि आयुष्य ठरवेल तसंच होईल असं  आयुष्य म्हणजे परिपूर्णच म्हणावं लागेल...... आयुष्यात कित्येकदा ठरवलेल्या गोष्टी, काम सोडून.., न ठरवलेल्याच गोष्टी घडताना दिसतात..... याच  एक कारण की सगळंच आपल्या हातात नसतं...नियतीला काही वेगळचं मान्य असतं.... तुमच्याकडून ते व्हावं ही अपेक्षा..... अन् दुसरं म्हणजे जे करायचंय त्याला दिशा नसणं ,त्याबद्दलची स्पष्टता नसणं....,धाडसाने सामोरे जाण्याची तयारी नसणं आणि अपयश पचविण्याची ताकद कमी पडणं...... यामुळेच माणूस पळवाटा शोधतो.... पण याने  योग्य तो मार्ग भेटत नाही तर माणूस पर्याय शोधतो.... अंतिम ध्येयापर्यंत पोहोचणं दूर... नुसतं भटकत राहतो....,  कौशल्य असून ही जीर्ण झालेल्या अडगळीत पडलेल्या पुस्तकासारखं वाटतो मग....., अस्तित्व टिकविण्याची धडपड सुरू असते...., स्वतःची ओळख निर्माण करण्याची गरज वाटू लागते.., आपल्यावर विश्वास ठेवणारे , पाठीवर हात ठेवून लढ म्हणणाऱ्यांची प्रतिमा उजळ कशी होईल याचा प्रयत्न केला जातो........, डोळ्यांच्या कडा पाणावलेल्या असतात अन् पुढचं सारं काही धूसर होतं......, जगावं तर कसं जगावं हा प्रश्न प...