पोस्ट्स

एप्रिल, २०२२ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

वेळेवर "नाही" म्हणायला शिकायला हवं

इमेज
वेळेवर "नाही" म्हणायला शिकायला हवं..... आयुष्यात वेळेवर " नाही " म्हणायला शिकायला हवं.... कधी कधी हो म्हणण्यापेक्षा नाही म्हणायचं खूपच अवघड होऊन जातं...... नाही म्हणायची वेळ आली की आपलं मन आपण विचार करायला लागतो तो म्हणजे समोरच्याला काय वाटेल.?.. तेच जवळचे असतील तर ते काय म्हणतील?  वाईट वाटेल काय त्यांना..?असे प्रश्न मनात घर करतात....  आपलं time जातंय ,किंवा आपल्याला ते करायचं नाही तरी आपण ते करतो...मनाविरुद्ध.....मग ते non productive गप्पा गोष्टींमध्ये मित्रांमध्ये,नातेवाईकांमध्ये किंवा आजूबाजूला जाणारा time असो किंवा carrier असो वा आयुष्यभरासाठीचा जोडीदार निवडताना.... मग नंतर नशिबाला बोल देतो आपण.... हे समजून ही वेळेवर नाही म्हणता येत नाही नसेल तर मग अवघड आहे....कधी हिंमतच नाही होत तर कधी स्वतःलाच जाणीव नसते वेळेची.... आपणच आपल्या वेळेची कदर नाही करत नाही तर लोक का करतील?  ज्या गोष्टी खरंच नको वाटतात आपल्या वेळ खर्चिक किंवा मनाविरुद्ध वाटतात त्यांना वेळीच "नाही" म्हणता यायला हवं.... हेचं आहे आपल्या हाती ... बाकी आयुष्यात कधी काय घडेल कशी परिस्थिती निर्मा...

मुखवट्यांच आयुष्य

  मुखवट्यांच आयुष्य मुखवट्यांच आयुष्य ते कितीसं?... कित्येक प्रकारचे मुखवटे घालून आपण रोज मिरवत असतो कधी मजबुरी म्हणून तर कधी दुःख आपल्याजवळ राहावं अन् सुख वाटावं म्हणून तर कधी एकद्याची नियतच तशी असते म्हणून..... पण मुखवटे खरंच गरजेचं ?...हो पण अन् नाही पण...., पण आपण तसचं वावरतो..., ते धारण करूनच......अगदी कंटाळवाण वाटलं तरी,....कधी स्वतः साठी तर कधी दुसऱ्यांसाठी काहीतरी करताना... फक्त माणसाची नियत साफ असावी.... पण आजकाल मुखवटे खोटे आणि दुसऱ्याला फसावण्यासाठीच जास्त वापरतात लोक....  social media वरती ही सर्रास बघतो....इतरांचे चांगले चुंगले photos आणि updates बघून आपलंच आयुष्य असं गंडलयं का?😀 असं कित्येकांच्या मनात येणं साहजिकच आहे... पण खरचं एखाद्या post/photo/video किंवा story वरून आपण एखाद्याचं सगळंच चांगलं आणि आपलं वाईट असं तर्क काढणं मुळात चुकीचं आहे.....  प्रत्येकाला आपापल्या आयुष्यात काही ना काही problems असतात...पण प्रत्येकजण जे काही चांगलं आहे तेच टाकत असतो ,हेच दाखवत असतो social media वरती....आणि  खऱ्या आयुष्यात आणि मनात काही वेगळंच..... सगळ्यांना संघर्ष ,...

Priorities

        Priorities मला आयुष्यात हे हवय पण मला करायचा कंटाळा आहे..आणि या उलट माझं ध्येय हे आहे अन् मी ते पूर्णत्वास नेण्यासाठी माझे १००% प्रयत्न देणार... असं दोन्ही गोष्टी बोलणारे लोक आपल्या आजूबाजूला आहेत.... आपण त्यातले कशात? हे ओळखणं महत्वाचं... स्वप्न पूर्ण करायची असतील तर प्रयत्न ही तसेच लागतात.... फक्त कल्पना करून काय होणारेय?..... कृती ही तशीच हवी...इच्छाशक्तीची जोड कृतीला असेल तर सारं काही शक्य आहे... कृतिविना विचार म्हणजे  मनात निव्वळ कल्पनांचे  मांडे रचल्या सारखंच आहे... आयुष्यात स्पष्टता हवी..., कुठं थांबायचं ,कुठवर चालायचं अन् कुठं पोहचायचं याची... आपल्या ध्येयपूर्ती च्या प्रवासात आपण सर्वात जास्त महत्त्व कशाला देतो यावर आपलं यश अपयश अवलंबून असतं.... येणाऱ्या प्रलोंभाना की मिळालेल्या वेळेला? अडथळे बनू पाहणाऱ्या लोकांना की  त्या परिस्थितीत साथ देणाऱ्यांना ? अतिविचाराने वाहवत जाण्याला की ठरवलेल्या ठिकाणी वेळेवर पोहोचण्याला? हे आपलं आपल्याला ठरवावं लागतंच ....जितक्या लवकर ठरवता येईल तेवढ्या लवकर ध्येयाने जवळ पोहचू..... त्यासाठी आपल्या prioritie...

महापुरुषांचा वारसा आणि जातीपाती

  महापुरुषांचा वारसा आणि जातीपाती जेंव्हा मी छत्रपती शिवरायांवरती कविता लिहली राजर्षी शाहू बद्दल स्तुतीसुमने गायली तर तेव्हा त्यांनी मला विचारलं तू मराठ्याची का?., ज्यावेळी मी महात्मा फुलेंवरती लिहलं त्यांनी विचारलं तू माळी जातीची का?., आद्य क्रांतिकारक वासुदेव फडके आणि उमाजी नाईकांचे गुण गायले तर विचारले ब्राह्मण की नायकाचे ओ तुम्ही?., डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मरणार्थ काही लिहले तर  मागून आवाज आला... दलित समजातून वाटतं..., अशी कैक गोष्टी ,उदाहरणे आहेत.. .. संत तुकाराम संत ज्ञानेश्र्वर एकनाथ महाराज चोखामेळा संत गाडगे महाराज तुकडोजी महाराज.... कित्येक वर्षांपासून यांनी एकतेसाठी कामे केली ....आणि आपण आज... आधीपेक्षा ही जास्त बुरसटलेले आहोत.....लाज वाटायला हवी आपल्याला.....आपल्या लोकांनी आपली त्या वेळची परिस्थिती सुधारण्यासाठी काय काय केलं ....हिंदू धर्मातल्या अनिष्ट प्रथा रुढी नष्ट व्हाव्यात अन्  धर्मातल्या चांगल्या गोष्टींचा प्रसार व्हावा यासाठी नाना प्रयत्न केले....एकीने जगू आपण म्हणून प्राणार्पण केले त्यांनी अन् आज?आज काय परिस्थिती आहे? ज्या समाज सुधारकांनी क्रांति...

स्पष्टता

इमेज
          स्पष्टता   आयुष्यातली आणि विचारांतली स्पष्टता माणसाला एक दिशा देते ....जगण्याला आणि आयुष्यात हवं ते साध्य करायला.....अन् नेमकं तेच नाही जमलं तर ? तर फरफट होते आयुष्याची आणि स्वतः ची ही.... दिशाहीन होत सारं काही मग.....अस्ताला जाणारा सुर्य ही आपल्याकडे पाठ फिरवून जातो असंच वाटतं.., हेलकावे खात आपली नाव असच भरकटते मग दिशाहीन होऊन..., पापण्या पाणावून डोळ्यांसमोर जणू सारं काही धूसर व्हायला लागतं.... आयुष्यात अशी परिस्थिती आली की घरच्यांशी आपल्या जवळच्या मित्र परिवार किंवा आपल्याला योग्य मार्ग दाखवेल अश्या व्यक्ती सोबत बोलावं.... आणि कुणी मार्गदर्शन करावयास नसेल तर स्वतःच स्वतःच मित्र तत्वज्ञ वाटाड्या व्हावं.. ... शांत राहुन आपल्यातच डोकवावं काय चुकले , का चुकले आणि आता काय करायला हवं....काय करायला नको होत आणि इथून पुढे काय टाळायला हवं ते आपसुकच समजतं मग... आयुष्यात सगळ्यांनाच सगळं काही मिळालं असतं तर? संघर्ष तो कसला ना... आव्हानं आहेत म्हणून जगण्याला अर्थ आहे आणि केलेले कष्टांना ही...मग ते आपल्या घरचे असो वा तुम्ही स्वतः.... योग्य मार्गावर असलो तर उत्...