किंमत

                   किंमत

काही गोष्टी शिकण्यासाठी खूप मोठी किंमत मोजावी लागते....

 असं म्हणतात देव आपली परिस्थिती बदलत नाही कारण त्याला आपली मनस्थिती बदलायची असते... पण मनःस्थितीच नाही बदलली तर? 
त्याच सवयी असतील तर? माहिती असून ही त्याच त्याच चुका करत असू तर?? 
तर मग repitation of cycles .... 
 म्हणूनच कधी कधी देव मनःस्थिती बदलायला परिस्थिती बदलवतो.....जेणेकरून तुम्ही स्वतः ला आतून change करायला हवं....बाहेरचा दिखावा काय कामाचा?....तुम्ही लोकांना फसवू शकता पण स्वतः च काय?स्वतःशी प्रामाणिक असावं माणसानं मग दुसऱ्यांशी.... 

आयुष्यात काय करावं कसं करावं कधी करावं..हे सगळं आपल्यालाच बघायचं असतं ..... नाही तर आयुष्य संपत नाही म्हणून जगणारे ही आहेत.....मरण येत नाही म्हणून आणि आलोय जन्माला म्हणून दिवस काढणाऱ्यांची कमी नाही...आणि success भेटत नाही म्हणून हार मानणाऱ्यांचीही कमी नाही...आपण त्यातले कोण हे बघणं जरुरी..... 
 प्रेमात risk घेणाऱ्याला आपल्याकडे मोठं समजतात त्यात arrange marriage करणाऱ्यांच ही काही वेगळं नाही..असो चांगलंच आहे पण एखाद्यानं job किंवा buisness करिता risk घ्यायचं म्हंटल तरी पन्नास प्रश्न आणि वरून तुला हे जमेल का किंवा पाय ओढणारे तयारच असतात.... म्हणूनच काय करायचं कसं मिळवायचं हा निर्णय सर्वस्वी आपलाच..... 

काही वेळेस एकट्यानेच मार्गक्रमण करावं लागत.... कुटुंबाचा आधार असेल तर मार्गक्रमण सोप्पं म्हणायचं
.... आपलं कुटुंब आणि जवळची काही माणसं यांचं मोलाचं योगदान असतं या सगळ्या प्रवासात....तोच काय ते आधार आपल्याला पुढं जायला..... 

आयुष्य हे असंच असतं काही मिळवत तर काही सोडून देत जगावं लागतं....कोणत्या गोष्टी compromise करायच्या हे समजणं महत्वाचं..... काही मिळवायचं तर मोठी किंमत मोजावी लागते हे मात्र खरं... आणि त्यासाठी तयार राहणं हेच आपल्या हाती.... 

 धन्यवाद ☺️🙏, 

#जगणं

 Writing ✍️© - Sayali S M 💞

टिप्पण्या

  1. खरं आहे काही गोष्टी मिळविण्यासाठी काही वेळा खूप मोठी किंमत मोजावी लागते

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

ही वेबसाईट कोणत्याही विषयावर,जाती लिंग वर्ण धर्म पंथ अथवा व्यक्ती यावर आक्रमक पवित्रा घेऊन टीका टिप्पणी करण्यासाठी नाही....इथे आपले विचार स्पष्टपणे अन् तार्किक पद्धतीने मांडले जातात (संविधान अनुच्छेद १९(१)) ....सारासार विचार करून आपल्या जीवनात काही चांगला प्रभाव पडत असेल तर उत्तमच...ही खाजगी ब्लॉग साइट आहे याची नोंद घ्यावी इथे कोणतीही स्पॅम comments करु नये धन्यवाद 🙏

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आयुष्य आणि बरंच काही...

स्वप्न आणि आपण

निराशा आणि आयुष्य.....