तेच ते
तेच ते उद्या कॅलेंडर बदलेल.... पण सामान्यांच्या आयुष्याचं काय? रोजचं जगणं तेच भाकरीसाठीची वणवण करणं तेच ते... तिच लोकल तोच प्रवास तेच रातच्याला उशाशी टेकणं तेच ते... एका दिवसाचा खटाटोप हा.., सरत्याला घालवायला श्रीमंतांचा पार्टीचा अट्टाहास हा आम्हाला मात्र उद्याची चिंता., सामान्य माणसाची जणू हीच व्यथा... तेच ते...... नवीन संकल्प रचती सारे नऊ दिवस वाही वारे तेच ते... रोजची उठाठेव तीच प्रेयसी प्रियकराच्या मिलनाची वेळ हीच तेच ते... संसाराचा रहाटगाडा ओढणारा तो त्याच्या सोबतीने चालणारी ती...., संसारात अडकलेले सारे मग मनी वाटे बॅचलरच बरे तेच ते..... दिवसाचा व्यवहार रात्रीचा अंधार ., यश अपयशाची चढाओढ जिंकेल त्याचा गवगवा हरेल त्याचा परत डाव नवा..., तेच ते..... दिवसामागून दिवस जाती., वय रेतीसारख सुटू पाही कवळ्या दातांपासुन ते कवळी पर्यंतचा हा प्रवास तेच ते..... तरी वाटे आशा देऊ जगण्याला नवी दिशा., आयुष्य ते कितीसं जगून घेऊया आजच्या क्षणात जरासं., नाहीतर आहे तेच ते...... धन...