पोस्ट्स

तेच ते

                                तेच ते  उद्या कॅलेंडर बदलेल.... पण सामान्यांच्या आयुष्याचं काय? रोजचं जगणं तेच भाकरीसाठीची वणवण करणं तेच ते... तिच लोकल तोच प्रवास तेच रातच्याला उशाशी टेकणं तेच ते... एका दिवसाचा खटाटोप हा.., सरत्याला घालवायला श्रीमंतांचा पार्टीचा अट्टाहास हा आम्हाला मात्र उद्याची चिंता., सामान्य माणसाची जणू हीच व्यथा... तेच ते...... नवीन संकल्प रचती सारे नऊ दिवस वाही वारे तेच ते... रोजची उठाठेव तीच प्रेयसी प्रियकराच्या मिलनाची वेळ हीच तेच ते... संसाराचा रहाटगाडा ओढणारा तो त्याच्या सोबतीने चालणारी ती...., संसारात अडकलेले सारे मग मनी वाटे बॅचलरच बरे तेच ते..... दिवसाचा व्यवहार रात्रीचा अंधार ., यश अपयशाची चढाओढ जिंकेल त्याचा गवगवा हरेल त्याचा परत डाव नवा..., तेच ते..... दिवसामागून दिवस जाती., वय रेतीसारख सुटू पाही कवळ्या दातांपासुन ते कवळी पर्यंतचा हा प्रवास तेच ते..... तरी वाटे आशा देऊ जगण्याला नवी दिशा., आयुष्य ते कितीसं जगून घेऊया आजच्या क्षणात जरासं., नाहीतर आहे तेच ते...... धन...

जगणं आणि बरंच काही....

जगणं आणि बरंच काही...... काही गोष्टी अन् व्यक्ती आणि आलेली परिस्थिती ही आपण किती granted घेतो ना... वाटतं आता सारं काही आलबेल.... तुमच्या व्यक्तिगत पातळीवर चाललेला तुमचा यशाचा संघर्ष, त्याला साक्षीदार असलेल्या काही व्यक्ती आणि जोडलं गेलेलं नातं ही ..हे सारेच आले त्यात..... वाटतं आता तरी गोष्टी आणि यशाचा मार्ग ही सुकर....कष्ट तेवढंच करायचेत पण मायेचं बोलणंआणि तितक्याच आत्मीयतेने विचारपूस गरजेची..... रखरखत उन पडल्यावर कुठेतरी सावली साठीच झाड दिसावं असच काहीसं. ...... स्पर्धा परीक्षेच्या प्रवासात अशी लोक भेटणं म्हणजे अहोभाग्य म्हणायचं आपलं..... आपल्या सुखात आणि कधी demotivated वाटलंच तर हक्काने बोलणारे अजूनच जवळचे वाटतात.... त्यांचं ते बोलणं आणि असणं मग हवंहवंसं,आधार देणारं वाटतं.......हळूच वाऱ्याची झुळूक यावी अन् मन आनंदून जावं इतकं ते मनाला भावणारं ..... पण कधी कधी नियती तेवढ्यात जोराचा झटका देते आणि भान हरपून चालणाऱ्या तुमच्या मनाला वास्तवात येऊन उतरवते....ढीगभर नसले तरी मोजकेच बरे .., तुम्हाला आणि नात्याला जपणारे ..,असं जणू सांगत असते....मग काय सारं काही पूर्ववत अगदी.... करणं तर तु...

सोडून द्यायचं असतं

  सोडून द्यायचं असतं ....   सारं काही आलबेल सुरू असताना अचानक अनपेक्षित घडावं आणि आपण एकटे सामोरे जावं असंच काहीस आयुष्यात घडतं.....कधी ही कल्पना केली नाही असे अनुभव येतात.... दुःखाचा डोंगर जणू आपल्यावरच कोसळलाय का असा प्रश्न पडतो मग...... थोडक्यात काही marks नी result जाणं असो किंवा कुशलता असून हवी ती नोकरी न मिळणं असो मग....   आयुष्यात कधी मनासारखं घडतं तर कधी मनाविरुद्ध ... सारं काही अनिश्चित..... कधी वेळ तर कधी लोक....भेटलेली माणसं.... कधी कधी आपला भ्रमाचा भोपळा फोडण्यासाठी देव असे प्रसंग अन् अनुभव देतो तर कधी आपल्याला वेळोवेळी मार्गावर आणण्यासाठी. .... एखद्या गोष्टी बद्दल किंवा व्यक्ती बद्दल किती गृहीत धरून चालतो आपण..... मी असा अभ्यास केला तर यावेळी हवा तो result निश्चितच .. पण नंतर तोच काही मार्क्सनी गेला तर..??.. सारं काही पहिल्या पासून सुरुवात....फक्त फरक काय तो चुकांचा शोध अन् अनुभव गाठीशी...ही एक जमेची बाजू.... यश त्यानंतरचा आनंद आवडतोच प्रत्येकालाच.....पण मार्ग मात्र अपयश निराशा अन् परत नव्याने उभारी घेणं यातून जातो हे मात्र आपण विसरतो.....पाठीशी खंबीर अस...

सीमोल्लंघन

    सीमोल्लंघन जुने जाऊ द्या मरणालागुनि जाळूनी किंवा पुरुनी टाका सडत न एका ठायी ठाका सावध ऐका पुढल्या हाका खांद्यास चला खांदा भिडवूनी एक तुतारी द्या मज आणुनी...  केशवसुतांची ही कविता आज पुन्हा आठवणीत आली.... किती मार्मिक भाष्य......वास्तवात आणण्यासाठी प्रयत्नशील असणारे..... एरवी आनंदाच्या गप्पा मारणारे आपण मात्र एकटं असताना आयुष्यात आजवर घडलेल्या घटना, झालेल्या चुका, आलेले कठीण बरे- वाईट प्रसंग , नकारात्मक विचार अन् तश्या व्यक्ती कैक गोष्टींचे ओझं डोक्यावर अन् मनावर घेऊन फिरत असतो .. अन् त्यातून मिळत काय तर काहीच नाही......उलट होतो तो मनस्ताप..,चिंता, स्वतःवर येणारा राग , वाया घालवलेला/गेलेला वेळ....हे बघून जास्तच वाईट वाटत ...पण हे वाटणं स्वाभाविक साहजिक आहे... पण नुसत वाटून घेऊन परत तेच करायचं का?? तर नाही......जर झालेल्या चुका तुम्हाला समजल्या असतील तर त्यावर विचार केला वाईट वाटलं इथवरच न थांबता त्यावर काम करायला हवं..... म्हणजे परत त्या होऊ नये यासाठी..... नाहीतर होतं ते repeatation   of Cycles .... त्याचं गर्तेत अजून अडकत जातो आपण आणि साध्य काहीच नाही ...... म्ह...

आयुष्य जगताना....

  आयुष्य जगताना .......  " खूप काही करायचं होत कल्पनेतच राहून गेलं... वाटलं करावसं तर वयचं निघून गेलं...... आहे तस जगण्यावाचून काय आहे आता हाती पश्चात्ताप होतोय आता जबाबदाऱ्या बघू की स्वप्न साकारू.... स्वप्न हे स्वप्नच राहील आता".....,  अशी वेळ येऊ द्यायची नसेल तर आता जे करायचं आहे ते आताच करा.....तुम्ही उमेदीच्या कोणत्याही वयात असा त्यातसुरुवात  करा......एका दिवसात यश मिळत नाही ...वर्षे  लागतात हवं ते मिळवायला....पण सुरुवात करून हळूहळू स्वतः मध्ये आणि आहे त्या कामात study मध्ये improvement हवी तर स्वप्न पूर्ण करता येईल... नाहीतर उतार वयात पश्चातपा शिवाय हाती काही नाही .... आता वय आहे संधी आहे आणि सोबती असणाऱ्यांचा support ही.....मग विचार कसला..... जे करायचं ते आजच.... कारण उद्या कधीच नसतो....तो फक्त 'आज'च असतो... भूतकाळात गेला की 'काल'... काही ही करताना Result काय असेल माहिती नसतं पण स्वतःवर विश्वास ठेवून आपण करत असतो की नाही ...यशस्वी होणारे हेच करतात... ' कर्म करत चल ',फळाची अपेक्षा नको'....आपली 'भगवद्गीता'  हेच सांगते ना..... पण ठाम अस...

पळवाटा अनिश्चितता आणि आयुष्य

  पळवाटा अनिश्चितता आणि आयुष्य ठरवेल तसंच होईल असं  आयुष्य म्हणजे परिपूर्णच म्हणावं लागेल...... आयुष्यात कित्येकदा ठरवलेल्या गोष्टी, काम सोडून.., न ठरवलेल्याच गोष्टी घडताना दिसतात..... याच  एक कारण की सगळंच आपल्या हातात नसतं...नियतीला काही वेगळचं मान्य असतं.... तुमच्याकडून ते व्हावं ही अपेक्षा..... अन् दुसरं म्हणजे जे करायचंय त्याला दिशा नसणं ,त्याबद्दलची स्पष्टता नसणं....,धाडसाने सामोरे जाण्याची तयारी नसणं आणि अपयश पचविण्याची ताकद कमी पडणं...... यामुळेच माणूस पळवाटा शोधतो.... पण याने  योग्य तो मार्ग भेटत नाही तर माणूस पर्याय शोधतो.... अंतिम ध्येयापर्यंत पोहोचणं दूर... नुसतं भटकत राहतो....,  कौशल्य असून ही जीर्ण झालेल्या अडगळीत पडलेल्या पुस्तकासारखं वाटतो मग....., अस्तित्व टिकविण्याची धडपड सुरू असते...., स्वतःची ओळख निर्माण करण्याची गरज वाटू लागते.., आपल्यावर विश्वास ठेवणारे , पाठीवर हात ठेवून लढ म्हणणाऱ्यांची प्रतिमा उजळ कशी होईल याचा प्रयत्न केला जातो........, डोळ्यांच्या कडा पाणावलेल्या असतात अन् पुढचं सारं काही धूसर होतं......, जगावं तर कसं जगावं हा प्रश्न प...