सीमोल्लंघन
सीमोल्लंघन
जाळूनी किंवा पुरुनी टाका
सडत न एका ठायी ठाका
सावध ऐका पुढल्या हाका
खांद्यास चला खांदा भिडवूनी
एक तुतारी द्या मज आणुनी...
केशवसुतांची ही कविता आज पुन्हा आठवणीत आली.... किती मार्मिक भाष्य......वास्तवात आणण्यासाठी प्रयत्नशील असणारे.....
एरवी आनंदाच्या गप्पा मारणारे आपण मात्र एकटं असताना आयुष्यात आजवर घडलेल्या घटना, झालेल्या चुका, आलेले कठीण बरे- वाईट प्रसंग , नकारात्मक विचार अन् तश्या व्यक्ती कैक गोष्टींचे ओझं डोक्यावर अन् मनावर घेऊन फिरत असतो ..अन् त्यातून मिळत काय तर काहीच नाही......उलट होतो तो मनस्ताप..,चिंता, स्वतःवर येणारा राग , वाया घालवलेला/गेलेला वेळ....हे बघून जास्तच वाईट वाटत ...पण हे वाटणं स्वाभाविक साहजिक आहे...
तर नाही......जर झालेल्या चुका तुम्हाला समजल्या असतील तर त्यावर विचार केला वाईट वाटलं इथवरच न थांबता त्यावर काम करायला हवं..... म्हणजे परत त्या होऊ नये यासाठी.....
नाहीतर होतं ते repeatation of Cycles ....
नकारात्मक गोष्टी अन् तश्या व्यक्ती या सगळ्या गोष्टी सोडून पुढं जाऊया...
सर्वांना दसऱ्याच्या मनःपूर्वक शुभेच्छा💐💐💐
धन्यवाद 😊,
#केशवसुत कविता
#आयुष्य 🌱
Writing©✍️- Sayali S M
© Copyright
Yes be limitless 💯🤩
उत्तर द्याहटवाYes... Absolutely 🤗
हटवा