स्वप्न आणि आपण

 

            स्वप्न आणि आपण 

असं म्हणतात ,
स्वप्न पूर्ण होतात म्हणून ती पहिली जातात...,
पण पहिली जाणारी सगळीच स्वप्न कुठं पूर्ण होतात..?!..

काही पूर्ण होतात तर काही कल्पनेतच......
पण त्याच काही स्वप्नांना सत्यात उतरवताना नाकीनऊ येतं ...
 खरं तर ,
एक वेळ अशी येते की आपली स्वप्ने ही केवळ आपली न राहता नाहीत ती आपल्या  कुटुंबाची आणि जवळच्यांची होऊन जातात......
तिथवर सारं काही ठीक ..,
पण ध्येयाच्या जवळपास पोहचायला अवधी बाकी असतानाच परत सारं काही पूर्ववत झालं तर?? 
जैसे थे! परत शुण्यापासून सुरूवात.....
अशावेळी भीती वाटायला सुरुवात होते....,
दडपण येऊ लागतं... 
वेळ रेतीसारखा हातातून निसटून जातोय आणि आपण आहे तिथेच... आयुष्य थांबलंय की काय असं वाटतं...
स्वतःवर ठेवलेला विश्वास जणू डळमळीत होऊ लागतो... ते म्हणतात ना self daubt तसं काहीसं...... आजवरचा सारा प्रवास डोळ्यासमोर तरळू लागतो.... 
यश अपयशाची गोळाबेरीज होऊ लागते....
आपण योग्य दिशेने जात आहोत की नाही आपले त्या मार्गाने प्रयत्न सुरू आहेत की नाही हे पाहणं जरुरीचं असतं तेही वेळोवेळी.....पण ते दुर्लक्षित झालं किंवा कमी पडलं की मग येरे माझ्या मागल्या....
 खडतर वाटेवर मार्गक्रमण करण्यास वेळ लागायचं मोठ्ठ कारण ठरावं हे.....
पण मला वाटतं गोष्टी सहज  नाहीत हे स्वप्न पाहणाऱ्याला ठावूक असतं...अपेक्षा ठेवण्याऱ्यांना हे माहिती असेलच असं नाही परंतु गोष्टी शक्य आहेत हे मात्र दोघेही ज्ञात.......

स्वप्न पूर्ण होतात म्हणून ती पाहिली जातात ही सकारात्मक ऊर्जा जोपर्यंत आपल्याला आतून जाणवणार नाही आणि ती ज्वलंत राहणार नाही तोपर्यंत स्वप्नांच्या बाजूने आपल्याकडून योग्य पाऊल पडेलच याची खात्री नाही.....

बाह्य motivation हे जणू अळवावरच्या पाण्यासारखं ....
बाकी आज जगतोय त्याहून उद्या आपलं जगणं, वागणं better असावं यासाठीच सगळ्यांची धडपड......
थोडक्यात काय तर जिंकण अंतिम नाही....प्रवास पुढे ही सुरूच...
आणि कदाचित पुढे जाऊन अपयश आले तर सगळचं संपलं असं ही नाही...
यावर सुरेश भट लिहतात,
"विझलो जरी आज मी...
हा माझा अंत नाही
पेटेन उद्या नव्याने
हे सामर्थ्य नाशवंत नाही.......!"

To be continued.........
धन्यवाद ..,☺️🙏💕


Written by - ✍️Sayali S M 🌿


© COPYRIGHT POLICY 

Follow me on Instagram @mazyakavita2020

& Subscribe on YouTube to ' Sayutalks poems '


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आयुष्य आणि बरंच काही...

निराशा आणि आयुष्य.....