किंमत
किंमत
काही गोष्टी शिकण्यासाठी खूप मोठी किंमत मोजावी लागते....
असं म्हणतात देव आपली परिस्थिती बदलत नाही कारण त्याला आपली मनस्थिती बदलायची असते... पण मनःस्थितीच नाही बदलली तर?म्हणूनच कधी कधी देव मनःस्थिती बदलायला परिस्थिती बदलवतो.....जेणेकरून तुम्ही स्वतः ला आतून change करायला हवं....बाहेरचा दिखावा काय कामाचा?....तुम्ही लोकांना फसवू शकता पण स्वतः च काय?स्वतःशी प्रामाणिक असावं माणसानं मग दुसऱ्यांशी....
आयुष्यात काय करावं कसं करावं कधी करावं..हे सगळं आपल्यालाच बघायचं असतं ..... नाही तर आयुष्य संपत नाही म्हणून जगणारे ही आहेत.....मरण येत नाही म्हणून आणि आलोय जन्माला म्हणून दिवस काढणाऱ्यांची कमी नाही...आणि success भेटत नाही म्हणून हार मानणाऱ्यांचीही कमी नाही...आपण त्यातले कोण हे बघणं जरुरी.....
प्रेमात risk घेणाऱ्याला आपल्याकडे मोठं समजतात त्यात arrange marriage करणाऱ्यांच ही काही वेगळं नाही..असो चांगलंच आहे पण एखाद्यानं job किंवा buisness करिता risk घ्यायचं म्हंटल तरी पन्नास प्रश्न आणि वरून तुला हे जमेल का किंवा पाय ओढणारे तयारच असतात.... म्हणूनच काय करायचं कसं मिळवायचं हा निर्णय सर्वस्वी आपलाच.....
काही वेळेस एकट्यानेच मार्गक्रमण करावं लागत.... कुटुंबाचा आधार असेल तर मार्गक्रमण सोप्पं म्हणायचं.... आपलं कुटुंब आणि जवळची काही माणसं यांचं मोलाचं योगदान असतं या सगळ्या प्रवासात....तोच काय ते आधार आपल्याला पुढं जायला.....
आयुष्य हे असंच असतं काही मिळवत तर काही सोडून देत जगावं लागतं....कोणत्या गोष्टी compromise करायच्या हे समजणं महत्वाचं..... काही मिळवायचं तर मोठी किंमत मोजावी लागते हे मात्र खरं... आणि त्यासाठी तयार राहणं हेच आपल्या हाती....
Writing ✍️© - Sayali S M 💞
👌👌🙏
उत्तर द्याहटवाछान👌👌👌👌👌 आयुष्यात प्रयत्न करत रहान खुप महत्वाच असत.
हटवाहो बरोबर आहे.... खूप आभार ☺️
हटवाखरं आहे काही गोष्टी मिळविण्यासाठी काही वेळा खूप मोठी किंमत मोजावी लागते
उत्तर द्याहटवाअगदीच......धन्यवाद 😊
हटवाअगदी बरोबर 👌👍
उत्तर द्याहटवाधन्यवाद 😊
हटवा