आयुष्य आणि बरंच काही...
"आकाशात आणि आयुष्यात उंच भरारी घेऊ पाहणाऱ्याने कोणत्याच पाशात अडकायच नसतं"..... असं व पुं च्या लिखाणातून वाचनात आलेलं.....
खरंच गुंतणं किती अवघड आहे अन् बाहेर पडणं मुश्किल मग ते स्वप्न असोत किंवा व्यक्ती....प्रेम असो वा मनासारखं करिअर... स्पर्धा परीक्षा असो वा स्वतः चा स्टार्टअप...
त्यात आपलंच आपल्या पासून दुरावणं....,किती भयानक असतं......आपल्या गोष्टी सोडून दुसऱ्यात हरवून जाणं सोपं वाटतं पण परत येणं खूप मुश्किलीेचं......
आयुष्य मस्त जगायचं serious व्हायला तरी कुठं असतं तेवढं आयुष्य?स्वतःहून योग्य त्या वेळी नाही serious झालो तर आयुष्य आपल्याकडनं ते करवून घेतच म्हणा.... कशाला मग तो विचारांचा अती ताण,? सारी कसरत आयुष्य नीट करायला...ते नीट होऊ बघत तोवर नवीन कायतरी.......पण हेच तर आयुष्य आहे....It's a journey with lots of miracles.....it's a bunch of happiness, sorrows ,struggles, hurdles, smiles, pain and so on..... live it without overthinking and without being damn serious..till u r breathing....u have nt control on this.... हे समजलं की आपण अजून जगायला लागतो....
वास्तव आणि कल्पनेतल्या गोष्टी या emotional आणि practical यासारख्याच एकाच नाण्याच्या दोन बाजू जणू........सारं कसं balanced करून चालायचं......नाहीतर तोल साधणं जरा अवघडच.....
पण एक आहे म्हणा..,
वास्तवाचे चटके लागले की काही काळ कल्पनेत बरं वाटतं.........,
रखरखत्या उन्हात प्यायला पाणी आणि डोक्याला सावली मिळावी इतकं ते सुखावणारं वाटतं......
खरंच ,
स्वतचं स्वतःपासून दुरावून जाऊ
इतकं कशात गुंतायचं नसतं..,
अस्तित्वच विसरून जाऊ इतकं भावनाविवश व्हायचं नसतं..,
परतीचे मार्ग बंद होतील इतकं अंतर कापायचं नसतं...,
उंच भरारी घेणाऱ्याने कधी कोणत्याच पाशात अडकून पडायचं नसतं..,
मुळात आधी स्वतःचं होऊन भरभरून असं जगायचं असतं....
धन्यवाद ,🌿
#आयुष्य #पाश
✍️ - Sayali S M 💞
@mazyakavita2020
© Copyright policy
या काहिशा ओळींमध्ये पुर्ण आयुष्याचा सार खुप सुंदर मांडलाय, खुपच प्रेरणादायी अस लिखाण आहे
उत्तर द्याहटवासुंदर 😍
Thank you so much ☺️....keep reading,keep loving ✍️😌
हटवाखूप छान या मध्ये पूर्ण आयुष्याचा प्रवास लिहला आहेस...😍
उत्तर द्याहटवाthank you so much😊.......
हटवा