तेच ते

                               तेच ते 

उद्या कॅलेंडर बदलेल....
पण सामान्यांच्या आयुष्याचं काय?

रोजचं जगणं
तेच भाकरीसाठीची वणवण करणं
तेच ते...

तिच लोकल तोच प्रवास
तेच रातच्याला उशाशी टेकणं
तेच ते...

एका दिवसाचा खटाटोप हा..,
सरत्याला घालवायला श्रीमंतांचा पार्टीचा अट्टाहास हा
आम्हाला मात्र उद्याची चिंता.,
सामान्य माणसाची जणू हीच व्यथा...
तेच ते......

नवीन संकल्प रचती सारे
नऊ दिवस वाही वारे
तेच ते...

रोजची उठाठेव तीच
प्रेयसी प्रियकराच्या मिलनाची वेळ हीच
तेच ते...

संसाराचा रहाटगाडा ओढणारा तो
त्याच्या सोबतीने चालणारी ती....,
संसारात अडकलेले सारे
मग मनी वाटे बॅचलरच बरे
तेच ते.....

दिवसाचा व्यवहार
रात्रीचा अंधार .,
यश अपयशाची चढाओढ
जिंकेल त्याचा गवगवा
हरेल त्याचा परत डाव नवा...,
तेच ते.....

दिवसामागून दिवस जाती.,
वय रेतीसारख सुटू पाही
कवळ्या दातांपासुन ते कवळी पर्यंतचा हा प्रवास
तेच ते.....

तरी वाटे आशा
देऊ जगण्याला नवी दिशा.,
आयुष्य ते कितीसं
जगून घेऊया आजच्या क्षणात जरासं.,
नाहीतर आहे तेच ते......

धन्यवाद ☺️..,

#जगणं
#नवं वर्ष नव्या आशा


लेखन ✍️- Sayali S Mandle 💕


( प्रेरणा आणि मनाला भावलेले, 
सद्यस्थितीत वाचनात -
#जाहिरनामा -नारायण सुर्वे ,
#वि स खांडेकर प्रस्तावित#विशाखा -कुसुमाग्रज,
#मृदगंध- विं दा करंदीकर )

©️ Copyright policy







टिप्पण्या

  1. खुपच छान, मनातील भावना शब्दांच्या मदतीने खुप छान मांडल्यात. यालाच तर जिवन म्हणतात.
    नविन वर्षात नव्या स्वप्नांसोबत नव्यानप्रवास करणं यालाच तर जगणं म्हणतात.

    उत्तर द्याहटवा
  2. मस्त लिखाण 👍💯

    सरत्या वर्षाच analysis करून उराशी बाळगलेले स्वप्न ह्या वर्षात पूर्ण कस होईल ह्यासाठी प्रयत्न करत ,जगण्याचा आनंद घेत पुढे जात राहणं हेच aspirants च जीवन .

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

ही वेबसाईट कोणत्याही विषयावर,जाती लिंग वर्ण धर्म पंथ अथवा व्यक्ती यावर आक्रमक पवित्रा घेऊन टीका टिप्पणी करण्यासाठी नाही....इथे आपले विचार स्पष्टपणे अन् तार्किक पद्धतीने मांडले जातात (संविधान अनुच्छेद १९(१)) ....सारासार विचार करून आपल्या जीवनात काही चांगला प्रभाव पडत असेल तर उत्तमच...ही खाजगी ब्लॉग साइट आहे याची नोंद घ्यावी इथे कोणतीही स्पॅम comments करु नये धन्यवाद 🙏

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आयुष्य आणि बरंच काही...

स्वप्न आणि आपण

निराशा आणि आयुष्य.....