जगणं आणि बरंच काही......
काही गोष्टी अन् व्यक्ती आणि आलेली परिस्थिती ही आपण किती granted घेतो ना...
वाटतं आता सारं काही आलबेल.... तुमच्या व्यक्तिगत पातळीवर चाललेला तुमचा यशाचा संघर्ष, त्याला साक्षीदार असलेल्या काही व्यक्ती आणि जोडलं गेलेलं नातं ही ..हे सारेच आले त्यात.....
वाटतं आता तरी गोष्टी आणि यशाचा मार्ग ही सुकर....कष्ट तेवढंच करायचेत पण मायेचं बोलणंआणि तितक्याच आत्मीयतेने विचारपूस गरजेची..... रखरखत उन पडल्यावर कुठेतरी सावली साठीच झाड दिसावं असच काहीसं....... स्पर्धा परीक्षेच्या प्रवासात अशी लोक भेटणं म्हणजे अहोभाग्य म्हणायचं आपलं.....आपल्या सुखात आणि कधी demotivated वाटलंच तर हक्काने बोलणारे अजूनच जवळचे वाटतात.... त्यांचं ते बोलणं आणि असणं मग हवंहवंसं,आधार देणारं वाटतं.......हळूच वाऱ्याची झुळूक यावी अन् मन आनंदून जावं इतकं ते मनाला भावणारं.....
पण कधी कधी नियती तेवढ्यात जोराचा झटका देते आणि भान हरपून चालणाऱ्या तुमच्या मनाला वास्तवात येऊन उतरवते....ढीगभर नसले तरी मोजकेच बरे .., तुम्हाला आणि नात्याला जपणारे ..,असं जणू सांगत असते....मग काय सारं काही पूर्ववत अगदी....
करणं तर तुलाच आहे ;सोबत असेल नसेल कुणी तरी वाट बदलणारेस का ?असं म्हणून जणू ती फ्टकरते आपल्याला...
ध्येय निश्चितीची जणू जाणीव करून देते.... भावनांमध्ये गुरफटून जाणाऱ्या मनाला आवर घालते....मग काय चुकत कुठ चुकतं शोध सुरू करून स्वतः ला ताळ्यावर आणावं लागतं.......आणि मार्गस्थ व्हावं लागतं......आयुष्यात लोक येतात आणि जातात...काही जवळ असून परकेपणाची भावना निर्माण करतात तर काही दूर असूनही आपलेपणा जपतात....
आयुष्याच्या प्रवासात व्यक्तींची साथ तुम्हाला भेटू शकते पण शेवटापर्यंत जायचं तर आपल्यालाच असतं.....त्या त्या वेळेचे ते ते सोबती...मला हे सारं बसच्या/रेल्वेच्या प्रवसासारख वाटतं..... प्रवासाच स्टेशन किंवा ज्याचं त्याच destination आलं की उतरायचं.. जसं बस स्थानक आलं की यात्री/ प्रवाशी कसे उतरून निघून जातात तसं काहीसं आयुष्यात आलेल्या लोकांचं असावं......त्या त्या वेळेपर्यंतच त्यांचं असणं...मिळायचा तो धडा घेतला की राम राम करून पुढच्या प्रवसाला जायला आपण आणि तेही मोकळे....... त्यांचं मग वाईट ही नाही वाटतं आणि आनंदून जावं असं ही नाही....फक्त आभारी राहतो आलेल्या चांगल्या वाईट लोकांचे आणि परमेश्वराचे ही.... वेळेवर दिलेल्या धड्यांमुळे आपण सुधारत पुढे जातो ....पण जास्त कौतुक तर शेवटापर्यंत जोडले गेलेले ,साथ देणारे ,पाठीवर हात ठेवून थांबू नकोस, पोहचणं अजून बाकी आहे.,.. असं म्हणणाऱ्यांचं...., तेच मग आपले........, पाठीशी खंबीर पणे राहुन जगण्याला नवी दिशा देणारे....., सर्वस्वी आपलेच.
धन्यवाद..☺️,
#जगणं
#makeslifehappy
writing©✍️ - Sayali S M 💕
© Copyright policy
👌
उत्तर द्याहटवाThank you ❣️
हटवाजे व्यक्ती आहेत कायम त्यांना आदर आणि बाकीच्यांना tata bye bye 😊
उत्तर द्याहटवाAgdi barobar 😃❣️
हटवाछान लिहतेस सायली , असच लिखाण राहुदेत,रोजच्या जीवनातील येणाऱ्या अनुभवातून लिखाण करतेस खूप छान,पण सगळेच अनुभव आपण स्वतः घेऊ नये ती काळजी घे...
उत्तर द्याहटवासाथ देणारे कायम नसतात सोबत कधी त्यांची वेळ किंवा स्वार्थ त्यांना आपल्यापासून दूर नेते पण जानाराला पण वाटत असते की तू पुढे जावे मोठी व्हावे...
कोणीतरी कायम काहीतरी शिकवूनाच जात असतो... त्यातील चांगले घ्यावे आणि आपली वाटचाल करावी...
तुझ ब्लॉग वाचून कळतय की तू स्पर्धा परीक्षा अभ्यास करत आहेस तुला खूप साऱ्या शुभेच्छा
खूप खूप धन्यवाद 😊....
हटवासगळे अनुभव स्वतः घ्यायला आयुष्य ते कितीस?..काही स्वानुभव तर काही इतरांच्या अनुभवातून शिकायचं... आयुष्यात भेटलेली माणसं आणि वाचलेली पुस्तकं खूप काही शिकवून जातात हे म्हणणं अगदी खरंच आहे आपण फक्त त्याला observation ची जोड द्यायची जगणं सुकर होतं मग....आणि हो बरोबर बोललात कुणीतरी कायमच काहीतरी शिकवून जातं, चांगलं घ्यायचं माफ करायचं आणि पुढच्या प्रवासाला मार्गस्थ.....कठीण काळात साथ दिलेल्या आणि न दिलेल्या व्यक्तींना माणूस विसरत नाही कधीच .., जमेची बाजू म्हणजे काही व्यक्ती आयुष्यात कायम असतात आपल्या यशाच्या साक्षीदार म्हणून.... सगळ्यांचं कुठलं भाग्य...नाही का?
Once again ty🙏 keep reading ,keep loving 😌✍️
काही व्यक्ती जरी आपल्या आयुष्यात नसले तरीही त्या तुमचा वाटचालीमध्ये लक्ष ठेवून असतात... कधी दीसत नाहीत आजूबाजूला पण सोबत असतात अनामित पणे...
उत्तर द्याहटवा