पळवाटा अनिश्चितता आणि आयुष्य

 पळवाटा अनिश्चितता आणि आयुष्य


ठरवेल तसंच होईल असं 

आयुष्य म्हणजे परिपूर्णच म्हणावं लागेल......

आयुष्यात कित्येकदा ठरवलेल्या गोष्टी, काम सोडून.., न ठरवलेल्याच गोष्टी घडताना दिसतात.....
याच  एक कारण की सगळंच आपल्या हातात नसतं...नियतीला काही वेगळचं मान्य असतं.... तुमच्याकडून ते व्हावं ही अपेक्षा.....

अन् दुसरं म्हणजे जे करायचंय त्याला दिशा नसणं ,त्याबद्दलची स्पष्टता नसणं....,धाडसाने सामोरे जाण्याची तयारी नसणं आणि अपयश पचविण्याची ताकद कमी पडणं......
यामुळेच माणूस पळवाटा शोधतो....

पण याने  योग्य तो मार्ग भेटत नाही तर माणूस पर्याय शोधतो....

अंतिम ध्येयापर्यंत पोहोचणं दूर... नुसतं भटकत राहतो....,

 कौशल्य असून ही जीर्ण झालेल्या अडगळीत पडलेल्या पुस्तकासारखं वाटतो मग.....,

अस्तित्व टिकविण्याची धडपड सुरू असते....,
स्वतःची ओळख निर्माण करण्याची गरज वाटू लागते..,

आपल्यावर विश्वास ठेवणारे ,
पाठीवर हात ठेवून लढ म्हणणाऱ्यांची प्रतिमा उजळ कशी होईल याचा प्रयत्न केला जातो........,
डोळ्यांच्या कडा पाणावलेल्या असतात अन् पुढचं सारं काही धूसर होतं......,
जगावं तर कसं जगावं हा प्रश्न पडतो.....

पळपुटेपणा तुम्हाला कधीच वर आणत नाही....तो मार्ग मोकळा झाला असं दाखवतो पण एका नवीन कोड्यात टाकतो....

तुमचा एक निर्णय तुमचं आयुष्य बदलवू पाहतो.....मग तो चांगला असो वा वाईट.....परिणाम ही तसेच मिळतात मग.,

पण एक निर्णय चुकला म्हणून पुढचा मार्ग चुकायचा की सुधरवून आपल्याला अनुकूल असा करायचा हे आपल्याच हाती....

आयुष्यात चढ उतार हे येतंच असतात....
गरज असते ते एखादी प्रतिकूल किंवा मनाविरुद्ध परिस्थिती  आल्यास त्यामध्ये स्वतः सदविवेक बुध्दी जागृत ठेवून योग्य तो निर्णय घेण्याची......
गरज असते येणाऱ्या संकटाला खंबीरपणे तोंड देण्याची, सामोरे जाण्याची, 
सारासार विचार करून वास्तवात  आणि भविष्यात उठणाऱ्या पडसादांचा परिणाम बघण्याची.....
गरज असते स्वतः च स्वतः चा ठाम आधार बनण्याची.... 

शेवटी काय तर 
Give up करण्याआधी स्वतः ला एकच  विचारायचं 

Why I started ?


धन्यवाद 🙏😊🤝,


Writing ✍️© - Sayali S M 💞


©Copyright policy




टिप्पण्या

  1. Palvata kadhnyat kahich arth nahi. Nntr regret krnyapexa ainveli ghetlela nirnay kdhipn better. Mg to changla aso kinva vait. uncertainity suddha matter krte karn goshtina vav asun jr exposure bhetat nsel tr mg avghd ahe . Pn 2nd chance bhetat asto tyachi patience ne hardwork krt vat bghavi ani opportunity grab kravi. Kahitri krn khup mahatvach ahe. Aajchi me andi udyachi me hyat samya asta kama naye.

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

ही वेबसाईट कोणत्याही विषयावर,जाती लिंग वर्ण धर्म पंथ अथवा व्यक्ती यावर आक्रमक पवित्रा घेऊन टीका टिप्पणी करण्यासाठी नाही....इथे आपले विचार स्पष्टपणे अन् तार्किक पद्धतीने मांडले जातात (संविधान अनुच्छेद १९(१)) ....सारासार विचार करून आपल्या जीवनात काही चांगला प्रभाव पडत असेल तर उत्तमच...ही खाजगी ब्लॉग साइट आहे याची नोंद घ्यावी इथे कोणतीही स्पॅम comments करु नये धन्यवाद 🙏

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आयुष्य आणि बरंच काही...

स्वप्न आणि आपण

निराशा आणि आयुष्य.....