जगणं आणि बरंच काही.....

 

जगणं आणि बरंच काही.....

आयुष्यात सारं काही मनासारखं घडेलंच असं नाही...
काही अचानक आलेल्या बदलांना ही  सामोरं जावं लागतं..., 

तसचं अचानक आलेल्या माणसांना ही ओळखून घ्यावं लागतं.....
आयुष्यात येणारी माणसं आणि  परिस्थिती काही सांगून येत नाही.....आणि ती कशी हे वेळ आल्यावरच समजत ....
  आजच्या काळात खरंच आपलं कोण आणि आपलं आहे असं दाखवणार कोण हे वेळेवर समजणं गरजेचं.....वयानुसार हे  समजेलच असं नाही पण सदविवेकबुद्धी जागृत असेल तर लवकर ज्ञात होत असावं.....
आयुष्यात मार्ग काढत निघालेल्या व्यक्तीला परिस्थितीच ओझ काय कमी असतं म्हणून हे माणसांचं ही.....पण चांगली लोक आहेत म्हणून जगण्याला अर्थ ही आहे अन् आपल्या गुणांना ही....आणि संतांनी म्हंटलच आहे,"निंदकाचे घर असावे शेजारी"....
असो, जीवनात अनेकवेळा मनाविरुद्ध घडतं....हवं तेव्हा हवी ती परिस्थिती आणि माणसं सोबत असतीलच असं नाही अश्यावेळी अनपेक्षित बदलांशी जुळवून घेणे तेवढंच महत्त्वाचं.....
त्यात जर असे बदल ध्येयाच्या मार्गात येणारे असेल तर  accept it & live it ....Or leave it ....
I mean to say,
 Either change Yourself as per the situation and requirements  Or leave it......
हवं त्यासाठी तसं स्वतःला mould करायचं नाहीतर सोडून द्याच  असं काहीसं....

ठरवलेलं त्याचं वेळी होईल असं काही नाही.....कमी जास्त अवधी नक्कीच लागू शकतो......आशावादी राहून प्रयत्न करत राहणं आपल्या हाती.....

#जगणं

धन्यवाद ☺️🙏,

Writing © ✍️- Sayali S M 💞


टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

ही वेबसाईट कोणत्याही विषयावर,जाती लिंग वर्ण धर्म पंथ अथवा व्यक्ती यावर आक्रमक पवित्रा घेऊन टीका टिप्पणी करण्यासाठी नाही....इथे आपले विचार स्पष्टपणे अन् तार्किक पद्धतीने मांडले जातात (संविधान अनुच्छेद १९(१)) ....सारासार विचार करून आपल्या जीवनात काही चांगला प्रभाव पडत असेल तर उत्तमच...ही खाजगी ब्लॉग साइट आहे याची नोंद घ्यावी इथे कोणतीही स्पॅम comments करु नये धन्यवाद 🙏

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आयुष्य आणि बरंच काही...

स्वप्न आणि आपण

निराशा आणि आयुष्य.....