Priorities
Priorities
मला आयुष्यात हे हवय पण मला करायचा कंटाळा आहे..आणि या उलट माझं ध्येय हे आहे अन् मी ते पूर्णत्वास नेण्यासाठी माझे १००% प्रयत्न देणार... असं दोन्ही गोष्टी बोलणारे लोक आपल्या आजूबाजूला आहेत.... आपण त्यातले कशात? हे ओळखणं महत्वाचं...
स्वप्न पूर्ण करायची असतील तर प्रयत्न ही तसेच लागतात....फक्त कल्पना करून काय होणारेय?.....
कृती ही तशीच हवी...इच्छाशक्तीची जोड कृतीला असेल तर सारं काही शक्य आहे...
कृतिविना विचार म्हणजे मनात निव्वळ कल्पनांचे मांडे रचल्या सारखंच आहे...
अन् कुठं पोहचायचं याची...
आपल्या ध्येयपूर्ती च्या प्रवासात आपण सर्वात जास्त महत्त्व कशाला देतो यावर आपलं यश अपयश अवलंबून असतं....
येणाऱ्या प्रलोंभाना की मिळालेल्या वेळेला?
अडथळे बनू पाहणाऱ्या लोकांना की
त्या परिस्थितीत साथ देणाऱ्यांना ?
अतिविचाराने वाहवत जाण्याला की ठरवलेल्या ठिकाणी वेळेवर पोहोचण्याला?
हे आपलं आपल्याला ठरवावं लागतंच ....जितक्या लवकर ठरवता येईल तेवढ्या लवकर ध्येयाने जवळ पोहचू.....
त्यासाठी आपल्या priorities set हव्यात .....
कोणत्या गोष्टींना,कुठल्या विचारांना, कोणत्या व्यक्तींना किती वेळ द्यावा अन् खरंच वेळ देणं गरजेचं आहे का हे बघणं महत्वाचं....
नको त्या ठिकाणी वेळ waste करण्यापेक्षा आपल्या कामात, ध्येयपूर्तीसाठी वेळ invaste केलेला उत्तमच....
कारण ज्या लोकांना वेळ देताय ती पुढं असतील की नाही ते नाही सांगू शकत,पण स्वप्न पूर्तीचा आनंद मनाला सुखावणारा नक्कीच असेल....
आवडलेला Quote -
"Time is free, but it’s priceless. You can’t own it, but you can use it. You can’t keep it, but you can spend it. Once you’ve lost it you can never get it back...-. Harvey Mackay.
काही गोष्टी आपल्याला वेळेवर समजतात तर काही वेळ गेल्यानंतर..... म्हणूनच हा लेख लिहावा वाटला....
वाचल्या बद्दल धन्यवाद.....
Writing© ✍️ - Sayali S M 💞
Priorities play vital role in life. Jitkya lvkr hyachi samaj titkyach lvkr successful hou shkto. #motivationalblog
उत्तर द्याहटवाHo barobr ahe.... thanks ☺️🙌
हटवाYes if you are giving priority to time then you'll successful definitely in your life
उत्तर द्याहटवाYes💯.... thanks☺️🙌
हटवाअगदी बरोबर आहे आयुष्यात priorities set हव्यातच....
उत्तर द्याहटवाखरं आहे.....धन्यवाद☺️🙌
हटवा