वेळेवर "नाही" म्हणायला शिकायला हवं

वेळेवर "नाही" म्हणायला शिकायला हवं.....



आयुष्यात वेळेवर " नाही " म्हणायला शिकायला हवं....कधी कधी हो म्हणण्यापेक्षा नाही म्हणायचं खूपच अवघड होऊन जातं......

नाही म्हणायची वेळ आली की आपलं मन आपण विचार करायला लागतो तो म्हणजे समोरच्याला काय वाटेल.?..
तेच जवळचे असतील तर ते काय म्हणतील?
 वाईट वाटेल काय त्यांना..?असे प्रश्न मनात घर करतात....

 आपलं time जातंय ,किंवा आपल्याला ते करायचं नाही तरी आपण ते करतो...मनाविरुद्ध.....मग ते non productive गप्पा गोष्टींमध्ये मित्रांमध्ये,नातेवाईकांमध्ये किंवा आजूबाजूला जाणारा time असो किंवा carrier असो वा आयुष्यभरासाठीचा जोडीदार निवडताना....
मग नंतर नशिबाला बोल देतो आपण....

हे समजून ही वेळेवर नाही म्हणता येत नाही नसेल तर मग अवघड आहे....कधी हिंमतच नाही होत तर कधी स्वतःलाच जाणीव नसते वेळेची....

आपणच आपल्या वेळेची कदर नाही करत नाही तर लोक का करतील? 
ज्या गोष्टी खरंच नको वाटतात आपल्या वेळ खर्चिक किंवा मनाविरुद्ध वाटतात त्यांना वेळीच "नाही" म्हणता यायला हवं....
हेचं आहे आपल्या हाती...


बाकी आयुष्यात कधी काय घडेल कशी परिस्थिती निर्माण होईल नाही माहिती पण त्या परिस्थितीमध्ये कसं उभारायचं हे नक्कीच करू शकतो... आपण अस केलं तसं केलं तर हे दुखवले जातील का यापेक्षा मी नाही म्हणलं तर माझ्या आयुष्यात काय change येईल हे बघणं महत्वाचं....
So लोकांना काही फरक पडत नाही ..थोडावेळ नाराज होतील इतकचं... वेळेनुसार तेही ok होतात..... 
प्रश्न राहतो तो आपला ....
वेळ गेल्यावर पश्चात्ताप करण्यापेक्षा वेळेवर " नाही " म्हणल्याने आपल्या आयुष्यात फरक पडणं बदल आणणं महत्वाचं.....
तेही हवा तो बदल.....🌿

# जगणं
धन्यवाद ☺️🙏,

लेखन © ✍️ - Sayali S M 💞


टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

ही वेबसाईट कोणत्याही विषयावर,जाती लिंग वर्ण धर्म पंथ अथवा व्यक्ती यावर आक्रमक पवित्रा घेऊन टीका टिप्पणी करण्यासाठी नाही....इथे आपले विचार स्पष्टपणे अन् तार्किक पद्धतीने मांडले जातात (संविधान अनुच्छेद १९(१)) ....सारासार विचार करून आपल्या जीवनात काही चांगला प्रभाव पडत असेल तर उत्तमच...ही खाजगी ब्लॉग साइट आहे याची नोंद घ्यावी इथे कोणतीही स्पॅम comments करु नये धन्यवाद 🙏

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आयुष्य आणि बरंच काही...

स्वप्न आणि आपण

निराशा आणि आयुष्य.....