मुखवट्यांच आयुष्य

 

मुखवट्यांच आयुष्य


मुखवट्यांच आयुष्य ते कितीसं?...
कित्येक प्रकारचे मुखवटे घालून आपण रोज मिरवत असतो कधी मजबुरी म्हणून तर कधी दुःख आपल्याजवळ राहावं अन् सुख वाटावं म्हणून तर कधी एकद्याची नियतच तशी असते म्हणून.....

पण मुखवटे खरंच गरजेचं ?...हो पण अन् नाही पण....,
पण आपण तसचं वावरतो..., ते धारण करूनच......अगदी कंटाळवाण वाटलं तरी,....कधी स्वतः साठी तर कधी दुसऱ्यांसाठी काहीतरी करताना...
फक्त माणसाची नियत साफ असावी....
पण आजकाल मुखवटे खोटे आणि दुसऱ्याला फसावण्यासाठीच जास्त वापरतात लोक.... 
social media वरती ही सर्रास बघतो....इतरांचे चांगले चुंगले photos आणि updates बघून आपलंच आयुष्य असं गंडलयं का?😀असं कित्येकांच्या मनात येणं साहजिकच आहे...
पण खरचं एखाद्या post/photo/video किंवा story वरून आपण एखाद्याचं सगळंच चांगलं आणि आपलं वाईट असं तर्क काढणं मुळात चुकीचं आहे.....
 प्रत्येकाला आपापल्या आयुष्यात काही ना काही problems असतात...पण प्रत्येकजण जे काही चांगलं आहे तेच टाकत असतो ,हेच दाखवत असतो social media वरती....आणि  खऱ्या आयुष्यात आणि मनात काही वेगळंच.....

सगळ्यांना संघर्ष ,दुःख चिंता अन् व्यथा असतात पण परिस्थिती अन् कारणं बहुदा वेगळी असावीत प्रत्येकाची....हे सगळं आहे म्हणून त्याचं भांडवल करणं पूर्णतः चुकीचंच.....म्हणून मुखवटे गरजेचं....
फक्त फरक असतो तो वेगवेगळ्या मुखववट्यांचा.....खरे अन् खोटे मुखवटे....

असच विचार आला मनात अन् वाटलं.,
दुसऱ्याला  motivate  करणं सोप्पं पण स्वतःच काय?
सगळंच दिसतं तसं असतं का?
किती तरी हसऱ्या चेहऱ्यांमागे पाणावलेले डोळे असतात...
कंठ दाटून आलेला असतो .... 
डोळ्यांत आसू असताना ही ओठावर मात्र हसू ही टिकवायचं असतं.....
सूर्य अस्ताला जात असताना ही उद्याच्या सूर्योदयाची वाट पाहणं म्हणजे जणू आजचा डळमळलेला मुखवटा काढून परत नव्या उमेदीचा मुखवटा धारण करून आयुष्य जगणं.....
दुःख अपयश संकटं कुणाला चुकली आहेत.....रात्रीनंतर दिवस अन् दुखानंतर सुख.....अपयशातून यशाकडे वाटचाल  हेच तर खरं जीवनचक्र आहे....

Show off साठी आपल्याजवळ नाही ते दाखवणं चुकीचंच आहे....पण कित्येक रात्री स्वतः उपाशी राहून मुलांच्या पोटापाण्यासाठी झगडणाऱ्या व्यक्तीला स्वतः ची भूक लपवण किती कठीण....
आपल्या मध्यम वर्गीय लोकांचं काय ते वेगळं...
आपलं भविष्य secure व्हावं म्हणून दिवसरात्र धावपळ करून आई वडील त्यांच्या चेहऱ्यावरचा थकवा लपवून आपल्या चेहऱ्यावर हसू आणतात, आयुष्याच्या शर्यतीत
हरलो ,पडलो तरी मी पाठीशी आहे  बाळा ,
असं म्हणून नाउमेदीचं सावट दूर करतात......
अश्यावेळी कळतं खरे मुखवटे ही असतात.....खऱ्या चेहऱ्याचे....


धन्यवाद🙏☺️,

Writing ©✍️ -  Sayali S M 💞

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

ही वेबसाईट कोणत्याही विषयावर,जाती लिंग वर्ण धर्म पंथ अथवा व्यक्ती यावर आक्रमक पवित्रा घेऊन टीका टिप्पणी करण्यासाठी नाही....इथे आपले विचार स्पष्टपणे अन् तार्किक पद्धतीने मांडले जातात (संविधान अनुच्छेद १९(१)) ....सारासार विचार करून आपल्या जीवनात काही चांगला प्रभाव पडत असेल तर उत्तमच...ही खाजगी ब्लॉग साइट आहे याची नोंद घ्यावी इथे कोणतीही स्पॅम comments करु नये धन्यवाद 🙏

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आयुष्य आणि बरंच काही...

स्वप्न आणि आपण

निराशा आणि आयुष्य.....