स्पष्टता
स्पष्टता
आयुष्यातली आणि विचारांतली स्पष्टता माणसाला एक दिशा देते ....जगण्याला आणि आयुष्यात हवं ते साध्य करायला.....अन् नेमकं तेच नाही जमलं तर ?
तर फरफट होते आयुष्याची आणि स्वतः ची ही....
दिशाहीन होत सारं काही मग.....अस्ताला जाणारा सुर्य ही आपल्याकडे पाठ फिरवून जातो असंच वाटतं..,आयुष्यात अशी परिस्थिती आली की घरच्यांशी आपल्या जवळच्या मित्र परिवार किंवा आपल्याला योग्य मार्ग दाखवेल अश्या व्यक्ती सोबत बोलावं....
शांत राहुन आपल्यातच डोकवावं काय चुकले , का चुकले आणि आता काय करायला हवं....काय करायला नको होत आणि इथून पुढे काय टाळायला हवं ते आपसुकच समजतं मग...
आयुष्यात सगळ्यांनाच सगळं काही मिळालं असतं तर? संघर्ष तो कसला ना... आव्हानं आहेत म्हणून जगण्याला अर्थ आहे आणि केलेले कष्टांना ही...मग ते आपल्या घरचे असो वा तुम्ही स्वतः....
योग्य मार्गावर असलो तर उत्तमच नसलो तर वेळीच विचार करायला हवा.... कारण आयुष्याला दिशा नसली की त्याची दशा होते हे मात्र तितकंच खरं....अन् हे वेळ गेल्यावर समजून काय करणार ना? वेळ आणि वय कुणासाठी थांबत नाही...
म्हणून वेळीच दिशा दिली की ध्येयापर्यंत पोहचणं सोपस्कर होत.... विचारांची स्पष्टता असेल तर वागण्याला आणि आयुष्याला ही कलाटणी भेटते.....
ज्या वेळी आपल्याला हे करता आलं तिथून पुढची वेळ आपलीच म्हणायची.... मरण येत नाही म्हणून जगायचं की खऱ्या अर्थाने जगायचं हे ज्याच्या त्याच्या वर असतं....
आयुष्याच्या प्रवासात लोक अश्यावेळी एक तर सल्ले देतील किंवा मजा बघतील....मग स्वतःच आयुष्य स्वतः च सावरायचं अन् पुढं मार्गक्रमण करायचं पुन्हा नव्या उमेदीने...,
स्वप्न बघावी अन् ती पूर्ण करण्यासाठी हवी ती धडपड ही असावी.....त्यात मग चुका होणं त्यातून शिकणं ही आलंच की....,

धन्यवाद.....🙏☺️
लेखन© ✍️- Sayali S M 💞🌱
👍🙏👌
उत्तर द्याहटवाDhanywad ☺️🙏
हटवाखुप सुंदर 💯💯
उत्तर द्याहटवाDhanywad 😊🙏
हटवा👍👌
उत्तर द्याहटवा😊🙏
हटवा👌👍
उत्तर द्याहटवाThank you ☺️🙏
हटवास्पष्टता हवीच तर हवं तिथं पोहचता येत..खूप छान लेखन सायली 👌✍️
उत्तर द्याहटवाअगदी बरोबर 💯......धन्यवाद☺️🙌
हटवा