आठवणीं आणि भावना यांचा खेळ काय तो निराळाच...
आठवणींचा डोंब मनात उसळला की विचार आणि भावनांची गुंफण होवू लागते....आठवणी नेहमीच चांगल्या किंवा हव्या हव्याशा असतीलच असं नाही....कधी कधी त्या संमिश्र ही असतात...कधी चेहऱ्यावर स्मित हास्य आणतात तर कधी पापण्या पाणवतात......
कधी स्वतःच स्वतःच कौतक करायला भाग पाडतात तर कधी आपण अस का केलं म्हणून स्वतःवर राग आणायचं काम करतात......काही ही असली तरी आठवणी या आपल्या सावलीसारख्या आपल्या सोबत असतात.....आयुष्याच्या flash back मध्ये तर त्याच घेऊन जातात....पण त्यांना कसं घ्यायचं..,म्हणजे positive way ने घेऊन आनंदी राहायचं, झालेल्या गोष्टींपासून काय सुधार करता येईल हे बघायचं की त्यातच अडकून रहायचं हे सगळं आपल्यावरच..... चुकांचा, विचारांचा आणि आपल्याकडे आता काय नाही त्याचा अतिरेक न करता सद्य परिस्थितीत काय करता येईल हे बघणं खूपच गरजेचं....नाहीतर मग मानसिक त्रास आणि निराशेची गर्ता यायला ही वेळ नाही लागत...आपल्या अवतीभोवती हेच बघतो आपण.., अगदी आपल्या आयुष्यात ही...... कारण कधी कधी मन हे चांगल्या गोष्टीं पेक्षा वाईट अनुभव- चुका याचा जास्त विचार करत....
म्हणूनच भावना, विचार आणि कृती यावर आपलं control असावं....म्हणणं सोप्पं आहे पण हीच तर आपली खरी परीक्षा ....झालं ते झालं म्हणून पुढं चालायचं कारण वेळ आणि आयुष्य कुणासाठीच थांबत नाही..... विचारांचा अतिरेक तितकाच घातक जितकं काहीच विचार न करता एखादा निर्णय घेणं आणि चुकण....म्हणूनच निर्णय घेण्या आधी विचार करणं योग्य...आणि घेतल्यावर तो योग्य ठरवणे हे ही गरजेचं...आयुष्य मुळात controllable &uncontrollable या गोष्टींमध्येच आहे....बेभान होऊन जगणं आणि आलं तसं जगणं असं जगणारे बरेच आहेत.., मध्य गाठून जगणारे ही,......जगाचा साचा तुम्हाला बांधून ठेवू पाहतो पण आपण कसं जगावं हा सर्वस्वी आपला प्रश्न.....आपली निती मूल्ये आपण कशी जपतो, वाढवतो हे महत्त्वाचं....बाकी ज्याचं त्याचं पाहण्याचा आणि वैचारिक दृष्टिकोन तो वेगळाच....
पूर्णच भावना विवश राहून ही चालत नाही आणि पूर्णपणे practical ही....जितकं यश महत्वाचं तितकंच नाती गोती ही.... या सगळ्यांत विचार भावनांचा गोंधळ नेहमीच उडतो...अश्या वेळी मात्र आपल्या हातात काय आहे ते सारासार विवेकबुद्धीने करायला हवं आणि ज्या गोष्टीं control करता येतात त्याचं करायला हवं ...म्हणजे वैचारिक आणि मानसिक ताण नाही येणार मनावर......बाकी
आठवणींवर control असेलच असं नाही...परंतु त्यात आकंठ बुडू नये इतकंच.....बहुदा यशस्वी लोक (मग ते एखाद्या क्षेत्रात असो वा आपल्या आयुष्यात) असंच करतं असतील.....आयुष्याच्या शेवटपर्यंत प्रत्येकालाच आयुष्य म्हणजे काय हे कळेल न कळेल ते वेगळंच पण जगणं महत्त्वाचं... तेही आनंदाने.....
स्वतचं होऊन जगता यायला हवं.....
#जगणं
धन्यवाद...,
लेखन ✍️Sayali S M☺️💞
Agdi chan... Lokana hech samjt nahiye ajun
उत्तर द्याहटवाThank you 😊
हटवाहळू हळू समजेल....आणि आपले लेख ही आहेतच😀✍️🙏