अलिप्तता आणि मी.....

 अलिप्तता आणि मी....

आजकाल मी न बोलताच सगळं काही बोलून जाते...माहिती का पण न बोलताच सारी नाती जपावीशी वाटतात आजकाल..,
आजूबाजूच्या गोष्टी आणि लोकं कळली की मग आपला सहवास आणि स्वतचं time ही खूप precious आणि हवं हवसं वाटतं...
माहिती नाही पण हो मला अलिप्त राहायला भारी वाटतं...अर्थात कुटुंबातील व्यक्ती आणि जवळचे लोक काल ही होते सोबत आणि आज ही आहेत ...परंतु आजकाल कुणाशी बोलून मोकळे होण्यापेक्षा आपल्या लेखणीतून उतरलेली अक्षर आणि वाचलेली पुस्तकं मला खूप जवळची वाटतात...म्हणजे मी  फक्त शरीराने अलिप्त राहन्याबद्दल नाही म्हणतय मनाने ही अलिप्त....म्हणजे आजच्या दुनियेची सगळा संपर्क तोडून राहा असं ही नाही...पण मोजकच जे गरजेचं आहे आपल्या उपयोगी आहे आपल्या आणि दुसऱ्याच्या ही ते घेणं आणि करणं..बाकी तासनतास गप्पा मारत एखाद्या विषयावर चर्चा अर्थात productive discuss असेल तर no issues.. पण time wasting असेल तर मग आपण का आपला time तिथे invest करायचं असा प्रश्न पडतो मग.... 
जबाबदारी आणि स्वप्न आणि वेळेची आणि वयाची टांगती तलवार आयुष्यात खूप काही शिकवून जाते......अगदी प्राथमिक शाळेतल्या एखाद्या शिक्षकसारख....काय करावं कसं जगावं ते का जगतोय इथपर्यंत...
मला दुसऱ्याच्या आयुष्यात काय चाललय हे पाहण्यापेक्षा स्वतचं आयुष्य सावरणं महत्त्वाचं वाटतंय...
अर्थात काहींना हा एक्कल कोंडीपणा वाटेल पण ज्यावेळी जबाबदारी आणि जगणं यामध्ये तुमची entry होते त्यावेळी भौतिक सुखापेक्षा किंवा वेळ नसताना वेळ घालवणाऱ्या गोष्टी आणि व्यक्तींना तुम्ही आपोआप दूर करता...आणि एका age च्या टप्प्यावर ते गरजेचं ही असतं नाहीतर पूर्ण आयुष्य मग पश्चातापात वाटतं...अर्थात सोबतीला तसे motivate करणारे कुटुंबासोबत जवळचे असतील तर बोलून व्यक्त व्हायला काही हरकत नाही..परंतु जवळचे म्हणुन तुमचा वेळ घालवनारे किंवा त्यांचा time जात नाही म्हणून. तुमच्याशी बोलणारे हे तुम्ही ओळखायला हवं...
कधीतरी एकमेकांची विचारपूस करणं काही गैर नाही... आपण समाजप्रिय प्राणी आहोत 😀हे ही तितकंच खरं आहे...so बोलून चालून राहा परंतु आपलं ध्येय काय आणि कुठ पोहचायचयं हेही बघा...अजुन काही वर्षांनी नुसतेच बोलणारे असतील की नाही माहिती परंतु ज्यांनी तुम्ही काहीतरी बनायची स्वप्न बघितली होती ते तुमचे आप्त अन् जिवलग ते मात्र नक्कीच असतील...
आयुष्यात ही phase प्रत्येकाच्या आयुष्याच्या एका वळणावर नक्की येते अन् आपली personal space आणि peace of mind खूप imp वाटायला लागतं...अगदी कुणाशी ही बोलण्यापेक्षा...आपला हक्काचा वेळ मग  फक्त आपलाच वाटतो...काहींना हे पटेल नाही पटेल माहिती नाही पण होय मला आवडतय अलिप्त राहायला....अलिप्त राहून ,सगळ्या गोष्टी करून स्वतच्या कामाला जबाबदारी स्वप्न यांना priority द्यायला..काहींना हे जरा selfish वाटेल पण जसं मी वरती म्हंटल,जबाबदाऱ्या आपली कर्तव्य आणि हातातून निसटत वेळ- वय असेल ना मग हा लोकांनी स्वार्थी म्हंटलेलं आणि तसं व्हायला ही आवडेल मला...
आयुष्यात खूप कमी लोकं तुमचं हित चिंतनारी असतात कुटुंबानंतर.,त्यांना नक्कीच जपा..पण वेळेला तुमच्याकडे पाठ फिरवनारे आणि केलेल्या मदतीचं भांडवल करणारे,..मागे खेचणारे,आज आहेत पण उद्या असतील की नाही काय माहिती अश्यंसाठी तुम्ही स्वतःची स्वप्न दावणीला लावणारे वेळीच लांब राहा सगळ्यापासून...काय माहिती कदाचित हे समजायला ही नंतर थोडा ही वेळ नसेल...
एकांत आणि अलिप्तता यात मला स्वतःला गवसल्याच सुख मिळतं...कुणाला न कळलेली मी मग स्वतः ला कळवून घेताना अंतर्मनात दडलेल्या अनुभवांचा गोष्टींचा उलगडा होतो... स्वभावाच्या नाना पैलूंचा आणि कुठं सुधारणा करायची हेही समजतं....हो म्हणूनच मला आवडत....एकांतात वेळ घालवायला....
वेळ काढून वाचल्या बद्दल 

धन्यवाद...,☺️🙏

लेखन ✍️©Sayali S M


U can Follow me also👇 Instagram @mazyakavita2020 and 

Search On YouTube channel 

Sayutalks Poems

https://instagram.com/mazyakavita2020?utm_medium=copy_link



टिप्पण्या

  1. मस्तच छान लिहीलय 👌
    खर आहे आयुष्यात सर्वात महत्वाच आहे तो स्वतःशी संवाद

    उत्तर द्याहटवा
  2. सुंदर लिहिलीस...... एकांत आणि माणूस हे समीकरण खूप आधीपासून आहे. शांत राहणे ,सत्य शोधणे , स्वतःची पडताळणी करणे, स्वतःशी बोलणे अशा कितीतरी चांगल्या गोष्टी आपण एकांतात करू शकतो. सांगणार हे आपणच आणि ऐकणार आहे आपणच.... 👌👍

    उत्तर द्याहटवा
  3. It's true, tumi swata madhe jevde bsy rahal tevd tumi success ani proper routine mde yenar
    👌👌🤟

    उत्तर द्याहटवा
  4. छान अलिप्त राहायचं वाईट विचार न वाईट विचार करणारे दू टप्पी लोकांपासून आवडले मला तुझे हे विचार.👍

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

ही वेबसाईट कोणत्याही विषयावर,जाती लिंग वर्ण धर्म पंथ अथवा व्यक्ती यावर आक्रमक पवित्रा घेऊन टीका टिप्पणी करण्यासाठी नाही....इथे आपले विचार स्पष्टपणे अन् तार्किक पद्धतीने मांडले जातात (संविधान अनुच्छेद १९(१)) ....सारासार विचार करून आपल्या जीवनात काही चांगला प्रभाव पडत असेल तर उत्तमच...ही खाजगी ब्लॉग साइट आहे याची नोंद घ्यावी इथे कोणतीही स्पॅम comments करु नये धन्यवाद 🙏

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आयुष्य आणि बरंच काही...

स्वप्न आणि आपण

निराशा आणि आयुष्य.....