निराशा आणि आयुष्य.....

निराशा आणि आयुष्य.....

भणंग आयुष्य झालं असताना...मनात विचारांचा डोंब उसळला असताना...माणसानं शांत आयुष्य कसं जगावं??....प्रत्येकालाच हे भेडसावत असेल.. मग प्रत्येक माणूस कसा व्यक्त होत असेल बरं?असच मनात विचार आला आणि मग बहुदा लेखणीला ही अनावर झालं...

आनंदी झाल्यास, दुःखी असल्यास आपण व्यक्त होतो जवळच्या व्यक्तींसोबत,Family, fndz आणि अनेक नाती...तसच आपल्या छंदामधून,आवडीतून..मग ते लेखन वाचन असो वा खेळ, गायन, नृत्य अश्या अनेक कला अंगी असलेल्या माणसाला व्यक्त करायला साधन मिळतं...पण सगळ्यांनाच हे जमतं का?

मनात कैक प्रश्नांनी नुसता गोंधळ घातला आहे....भावना सांगणं जमत नसेल तर मग शब्दातून बरसायला एका लेखकाला चांगलचं जमतं....परंतु अश्यांच काय ज्यांना व्यक्त करायला साधन नाही किंवा व्यक्ती ही? काय करत असतील ती सगळी लोकं?  ज्यांना कुणीच नाही ते कसं करत असतील?  पण ज्यांना व्यक्त करायला जवळची लोक आहेत ती सारी माणसं तरी कुठं व्यक्त होतात?..

मनावर ताबा मिळवण्या इतपत ते कठीण असावं का?  किंबहुना त्याहून जास्त कठीण असतं भावनेचा गुंता सोडवण....यामुळेच माणसाला निराशेची गर्ता येत असावी... निराशेतून बाहेर पडून स्वतः च आयुष्य सावरणाऱ्यांच मला कौतुक वाटतं....त्याहून कौतुक स्वतः च आयुष्य सावरून दुसऱ्याला दिशा दाखवणाऱ्या व्यक्तीचं वाटतं...स्वतः निराधार असताना दुसऱ्याला आधार देणाऱ्यांची कमाल असते नाही...

ज्यावेळी कुणीच नसतं सोबत त्यावेळी आपलं आपल्यालाच चालायचं असतं.....या सगळया मनाच्या लहरी आणि भावनिक गुंत्यातून स्वतःला सावरत पुढं मार्ग क्रमन करत राहायचं असतं...पण वेळेला हे सगळं कळणे गरजेचं....उगीच आयुष्य जगताना मनावर ताण येतो अन् संकटांचा सामना करू शकत नाही म्हणून ते संपवणं हे साफ चुकीचं....आयुष्य एकदाच मिळतं..आणि ते पुरेपूर जगायला हवं... 

कोणतं ही संकट, वाईट वेळ हे काही कायमस्वरूपी नसतं...आयुष्य जगताना आपल्या चुकांच ओझ घेऊन जगला तर येणारं time ही गेलेल्या वेळे सारखं घालवाल...अन् ते ही 'Past ' होणार आहे.....म्हणून काही गोष्टी जिथल्या तिथं सोडलेल्या बरं... ते म्हणतात ना Let it Go.. पण कधी आणि कोणत्या गोष्टीना करायला हवं हे समजणं ही तितकंच महत्त्वाचं...गेलेला वेळ हे कसं जगायचं ते शिकवतो आणि येणारी वेळ काय करायला हवं ते सांगते...मग ती कशी utilize करायची हे आपल्या हातात आहे....

Negative विचार सोडा आणि नव्या उमेदीने कामाला लागा....

आयुष्य खूप सुंदर आहे आपल्या माणसांसोबत जगा..आनंदी राहा....


                            धन्यवाद....☺️🙏,

                      ✍️©लेखन - Sayali S M


© Copyright policy










टिप्पण्या

  1. एकदम बरोबर 💯
    जितके स्वत:ला व्यस्त ठेवले तितके चांगले अशावेळी. नवीन गोष्टी शिकल्याने जगण्याची उमेद ही कायम रहाते.😊

    उत्तर द्याहटवा
  2. व्यक्त होण्याची पद्धत ज्याची त्याची वेगळी असते पण पद्धत काहीही असो.. व्यक्त होतं महत्त्वाचं आहे.. कुढत बसण्यापेक्षा व्यक्त होणं कधीही चांगलं.. आणि दुसऱ्याला आधार देता येणं हे सर्वात भारी काम..

    उत्तर द्याहटवा
  3. I can relate it. व्यक्त होण्यासाठी कुणीतरी, काहीतरी असायला हवं नसेल तर पुढे जाऊ की परतू मागे असच होत.🙂
    Thanks for article, it helps lot.
    Really appreciate it.

    उत्तर द्याहटवा
  4. आयुष्याने एक शिकवण दिली, कोणाच्या चुका उणिवा शोधत बसू नका. पटल तर ठीक नाहीतर निग. अस म्हणता यायला पाहिजे आयुष्य सुंदर आहे ते भरभरून आनंदाने जगता यायला पाहिजे

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

ही वेबसाईट कोणत्याही विषयावर,जाती लिंग वर्ण धर्म पंथ अथवा व्यक्ती यावर आक्रमक पवित्रा घेऊन टीका टिप्पणी करण्यासाठी नाही....इथे आपले विचार स्पष्टपणे अन् तार्किक पद्धतीने मांडले जातात (संविधान अनुच्छेद १९(१)) ....सारासार विचार करून आपल्या जीवनात काही चांगला प्रभाव पडत असेल तर उत्तमच...ही खाजगी ब्लॉग साइट आहे याची नोंद घ्यावी इथे कोणतीही स्पॅम comments करु नये धन्यवाद 🙏

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आयुष्य आणि बरंच काही...

स्वप्न आणि आपण