कुछ तो लोग कहेंगे.....

 कुछ तो लोग कहेंगे....

 भूतकाळातल्या काही चुका जेव्हा वर्तमान काळात डोकावतात..अन् त्याला सामना करायला मी आज खंबीर आहे पण मी असं केलं वागलो/वागले तर लोक काय म्हणतील?काहीतरी वेगळं करायचं आहे मग लोक काय म्हणतील?प्रत्येकाच्या मनात असे अनेक प्रश्न येतात अन् जे काही करायचं ते राहून जात...कोण लोक?? काय बोलणार आहेत तुम्हाला?
मान्य आहे आपण ज्या समाजात राहतो वावरतो तिथं काही गोष्टींचं भान ठेऊन वागणं बोलणं गरजेचं आहे आपल्यासाठी अन् समजासाठी ही..परंतु ज्यावेळी तुमच्या स्वतःच्या आयुष्यासाठी,Career चा निर्णय घेण्यात (जॉब करण्यात अगदी लग्न करण्यात ही )लोक काय म्हणतील याच विचार करायचा?का?आपली स्वप्न जबाबदारी यांना side ला करून लोकांनी आपल्याला नेहमीच चांगलं म्हणावं हा अट्टाहास का?आज जे मागे खेचणारे लोक असतील तेच उद्या तुम्ही यशवंत झाल्यावर तुमचे गुणगान गात असतात मग हा सगळा खटाटोप का?लोक काय म्हणतील म्हणून आपण एक पाऊल मागे जाणं कितपत योग्य आहे?कुणाला कमी वेळेत यश मिळतं २४-२५ मध्ये तर कुणाला ३०-३५ मध्ये अगदी ६५-७०मध्ये ही..,लोकांचं काय... successful झाला तरी luck च नाव देऊन रिकामे अन् unsuccessful असताना आपल्याला जमतच नाही ते तुझ्या आवाक्या बाहेरच होत/आहे असं म्हणून टोमणे देणारे ....
गरज असते ते या सगळ्यात संयमी राहून आपलं ध्येय गाठण्याची....मान्य आहे जरा कठीणच आहे पण अशक्य तर नाही ना....आयुष्य एकदाच मिळतं मग ते कसं जगावं आणि काय करावं हे आपल्या हातात आहे....तुम्ही तुमच्या ध्येपूर्तीसाठी लढत असता त्यावेळी कोण असत सोबत??हे लोक?की तुम्ही स्वतः आणि तुमची family? काही मोजकी शुभचिंतक अशी
मित्रमंडळी ? भेटलं ना उत्तर...हेच कायम पाठीशी असतात, यांना काय वाटेल याचा विचार करा,मग लोक काय म्हणतील यापेक्षा स्वत:ची स्वप्न अन् परिवार जास्त जवळच वाटेल आणि अजुन किती मैल अंतर आहे यशासाठी हेही जाणवेल...ज्यावेळी आई वडीलांना proud feel कराल स्वत:च goal achieve कराल त्यावेळी हेच लोक तुमचं कौतुक करायला ही मागे पुढे बघत नाहीत... कसं आहे यशाच्या अनेक परिभाषा आहेत...कुणी private sector मध्ये प्रगती करत तर कुणी gov job मध्ये तर कुणाला business development करायचं असत...
सांगायचं इतकचं आहे की आयुष्यात यशाच्या संकल्पना प्रत्येकाच्या वेगळ्या आहेत अन् त्या जपणं आपल्या हातात आहे...केवळ लोक काय म्हणतील म्हणून मार्गच change करणं चुकीचं आहे....हा आता तो मार्ग चुकीचा की योग्य हे पडताळणं मात्र आपल्या हातात आहे..आणि म्हणूनच  आयुष्य आपलं आहे ते कसं जगावं आणि काय करून दाखवाव हे सर्वस्वी आपल्यावर आहे ....लोकांचं काय ओ...नाराज झाले तर ते देवाला ही बोल लावतात...म्हणूनच निर्णय आपला असावा म्हणजे पडलो तर सावरायचं बळ ही येत मग अन् कुटुंबाची साथ असेल तर लोकांचं काय....So Be happy and stay positive in all situations..& go ahead... 
Q की...कुछ तो लोग कहेंगे.....लोगों का काम हैं कहना...

#आयुष्य 

धन्यवाद...,
    ✍️©लेखन - Sayali S M



<script async  
src="https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-2448967616493096   "
     crossorigin="anonymous"></script>

टिप्पण्या

  1. खरं आहे. लोकांचा विचार करत बसले तर वाट लागलीच म्हणून समजा. म्हणून आपल्या ट्रॅकवर राहुन प्रयत्न केलेले कधीही चांगले.
    Good thoughts 💯👏

    उत्तर द्याहटवा
  2. एकदम बरोबर
    मस्त
    प्रत्येकाने आपल्या आयुष्यात आपन कशाला प्राधान्य दयायच हे ठरवल पाहीजे. लोकांचा विचार करुन काहीच साद्य होत नाही.

    उत्तर द्याहटवा
  3. एकदम बरोबर
    प्रत्येकाने आपल्या आयुष्यात आपन कशाला प्राधन्य दयायच हे ठरवल पाहीजे.
    तु जे लिहीलयस ते प्रत्येक व्यक्तिला नक्कीच प्रेरनादायी ठरेल.
    छान ।

    उत्तर द्याहटवा
  4. छान लिखान,काही प्रमाणात तुमच्या ही सहमत पण काही व काही लोक आपल्या चांगल्यासाठीच सांगत असतात बस तेलोक ओळखता यायला हवे आपण म्हणतो ना गुरू शिवाय जिवन व्यर्थ आपला गुरु ओळखता यायला हवा...तो या पृथ्वीतलावर असेलचं असं नाही फक्त आपण त्याला ओळखतात यायला हवं

    उत्तर द्याहटवा
  5. अगदीच🙌पण हे नकारात्मक बोलणाऱ्या लोकांसाठी लिहलय...त्यांच्यामुळे आपण आपला स्वप्नांचा मार्ग बदलू नये....बाकी गुरु आणि मार्गदर्शक हवेतच.... गुरुविन कोण दाखविल वाट म्हंटलच आहे....

    उत्तर द्याहटवा
  6. खूप छान लिखाण आहे, जीवनात लोक काय म्हणतील असा विचार करत बसलो तर आपण आपलें जीवन आपल्याला पाहिजे असे कधी जगणार?
    लोक काय म्हणतील याच्या पेक्षा तुझे मन काय सांगते ते खूप महत्वाचे वाटते.

    उत्तर द्याहटवा
  7. छान लेखन आहे....👌👌आयुष्य खूप सुंदर आहे त्याला आपल्या सकारात्मक विचारांची जोड घेऊन अजून सुंदर बनवायचं..👍

    उत्तर द्याहटवा
  8. खरंच आहे लोक काय म्हणतील याचा विचार करत बसलं तर आपल आयुष्य आपल्या मनाप्रमाणे जगायचं राहूनच जाईल त्यामुळेच लोकांचा विचार जास्त न करता स्वतः व आपल्या जवळच्या लोकांचाच विचार केला तर आपल आयुष्य मजेत जगता येतं छान विचार आहेत.👍

    उत्तर द्याहटवा
  9. लोकांचं काय ते तुमच्या १००चांगल्या गोष्टींकडे दुर्लक्ष करून तुमच्या हातून झालेली एक चूक कायम लक्षात ठेवतात त्यामुळे अशा लोकांचा विचार न केलेलाच बरा. आयुष्य खूप सुंदर आहे लोकांचा विचार करून ते वाया नाही घालवायचं.👍

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

ही वेबसाईट कोणत्याही विषयावर,जाती लिंग वर्ण धर्म पंथ अथवा व्यक्ती यावर आक्रमक पवित्रा घेऊन टीका टिप्पणी करण्यासाठी नाही....इथे आपले विचार स्पष्टपणे अन् तार्किक पद्धतीने मांडले जातात (संविधान अनुच्छेद १९(१)) ....सारासार विचार करून आपल्या जीवनात काही चांगला प्रभाव पडत असेल तर उत्तमच...ही खाजगी ब्लॉग साइट आहे याची नोंद घ्यावी इथे कोणतीही स्पॅम comments करु नये धन्यवाद 🙏

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आयुष्य आणि बरंच काही...

स्वप्न आणि आपण

निराशा आणि आयुष्य.....