पोस्ट्स

सुंदरता आणि जगणं...

इमेज
  सुंदरता आणि जगणं.... आपण अश्या समाजात राहतो जिथं.... सुंदर दिसणं म्हणजे मुलीने गोरं असणं सडपातळ बांधा असणं...अजून कैक गुण..तसचं काहीसं मुलांच्या बाबतीत ही आहे...पैसा असणं तो काळा का गोरा हे बघणं.. म्हणजे असण्याला काहीच नाही का महत्त्व...??? माणसाने सुंदर असावं की मनाने तनाने...?अर्थात त्याच उत्तर असेल दोन्हीं नी पण...परंतु सुंदर तेच्या भाकड कल्पना ही बदलायला हव्यात ना..

विश्वास....

विश्वास ....   विश्वास..... किती लहान शब्द आहेना...पण या एका शब्दात  जुनी नवी सारी नाती आयुष्यभर जपली जातात....  विश्वास....नावाला शब्द...पण कमावयला अख्खं आयुष्य ही अपूरं पडतं अन् गमावायला एक क्षण ही पुरेसा असतो ... पण विश्वास आहे म्हणून तर नात्यात प्रेमाची,आपलेपणाची घट्ट नीव आहे जणू...मग ते नात कोणतं ही असो... आई वडील बहीण भाऊ पासून ते मैत्री  प्रेम आयुष्यभरासाठीचा जोडीदार, आपलं काम, career मध्ये इथपासून ते शेवटच्या श्वासापर्यंत विश्वासाने जोडलेली माणसं.... आयुष्याच्या या प्रवासात अनेक लोक भेटतात... कधी विश्वासाने जवळ येतात अन् तेच विश्वास गमावला की तीच लोक अगदी अनोळखी होतात....पण यातून एक मात्र चांगलं होतं म्हणा...माणसं ओळखायला आपण वेळीच शिकतो...अन् परत चूक करताना स्वतः लाच सावरतो...काही गोष्टी अन् व्यक्ती वेळीच सोडून द्यावा लागतात काही मनात न ठेवता...आयुष्य अजुन सोपं होतं मग जगताना..   विश्वास अन् अनुभव मला एकाच नाण्याच्या दोन बाजू वाटतात...नवनवीन गोष्टी शिकण्यास प्रवृत्त करतात अन् आहे त्या गोष्टी अन् व्यक्ती जोडून ठेवयला ही मदत करतात.... विश्वास प्रत्येकवेळी...

निराशा आणि आयुष्य.....

निराशा आणि आयुष्य..... भणंग आयुष्य झालं असताना...मनात विचारांचा डोंब उसळला असताना...माणसानं शांत आयुष्य कसं जगावं??....प्रत्येकालाच हे भेडसावत असेल.. मग प्रत्येक माणूस कसा व्यक्त होत असेल बरं?असच मनात विचार आला आणि मग बहुदा लेखणीला ही अनावर झालं...

कुछ तो लोग कहेंगे.....

  कुछ तो लोग कहेंगे....   भूतकाळातल्या काही चुका जेव्हा वर्तमान काळात डोकावतात..अन् त्याला सामना करायला मी आज खंबीर आहे पण मी असं केलं वागलो/वागले तर लोक काय म्हणतील?काहीतरी वेगळं करायचं आहे मग लोक काय म्हणतील?प्रत्येकाच्या मनात असे अनेक प्रश्न येतात अन् जे काही करायचं ते राहून जात...कोण लोक?? काय बोलणार आहेत तुम्हाला? मान्य आहे आपण ज्या समाजात राहतो वावरतो तिथं काही गोष्टींचं भान ठेऊन वागणं बोलणं गरजेचं आहे आपल्यासाठी अन् समजासाठी ही..परंतु ज्यावेळी तुमच्या स्वतःच्या आयुष्यासाठी,Career चा निर्णय घेण्यात (जॉब करण्यात अगदी लग्न करण्यात ही )लोक काय म्हणतील याच विचार करायचा?का?आपली स्वप्न जबाबदारी यांना side ला करून लोकांनी आपल्याला नेहमीच चांगलं म्हणावं हा अट्टाहास का?आज जे मागे खेचणारे लोक असतील तेच उद्या तुम्ही यशवंत झाल्यावर तुमचे गुणगान गात असतात मग हा सगळा खटाटोप का?लोक काय म्हणतील म्हणून आपण एक पाऊल मागे जाणं कितपत योग्य आहे?कुणाला कमी वेळेत यश मिळतं २४-२५ मध्ये तर कुणाला ३०-३५ मध्ये अगदी ६५-७०मध्ये ही..,लोकांचं काय... successful झाला तरी luck च नाव देऊन रिकामे अन् unsucce...