विश्वास....
विश्वास....
विश्वास..... किती लहान शब्द आहेना...पण या एका शब्दात जुनी नवी सारी नाती आयुष्यभर जपली जातात....
विश्वास....नावाला शब्द...पण कमावयला अख्खं आयुष्य ही अपूरं पडतं अन् गमावायला एक क्षण ही पुरेसा असतो... पण विश्वास आहे म्हणून तर नात्यात प्रेमाची,आपलेपणाची घट्ट नीव आहे जणू...मग ते नात कोणतं ही असो... आई वडील बहीण भाऊ पासून ते मैत्री प्रेम आयुष्यभरासाठीचा जोडीदार, आपलं काम, career मध्ये इथपासून ते शेवटच्या श्वासापर्यंत विश्वासाने जोडलेली माणसं....
आयुष्याच्या या प्रवासात अनेक लोक भेटतात... कधी विश्वासाने जवळ येतात अन् तेच विश्वास गमावला की तीच लोक अगदी अनोळखी होतात....पण यातून एक मात्र चांगलं होतं म्हणा...माणसं ओळखायला आपण वेळीच शिकतो...अन् परत चूक करताना स्वतः लाच सावरतो...काही गोष्टी अन् व्यक्ती वेळीच सोडून द्यावा लागतात काही मनात न ठेवता...आयुष्य अजुन सोपं होतं मग जगताना..
विश्वास अन् अनुभव मला एकाच नाण्याच्या दोन बाजू वाटतात...नवनवीन गोष्टी शिकण्यास प्रवृत्त करतात अन् आहे त्या गोष्टी अन् व्यक्ती जोडून ठेवयला ही मदत करतात.... विश्वास प्रत्येकवेळी दुसऱ्यावर च असावा असं नाही.. स्वतः वर असलेला विश्वास च आयुष्य जगायला ,काहीतरी वेगळं करायचं आहे अन् ते achieve करायला, सार्थकी न्यायला पुरेसा आहे....
कधी कधी असं वाटतं एखाद्याच्या विश्वासाला विश्वासाने जिंकणं जितकं कठीण आहेना तितकंच कठीण असावं तुटलेल्या विश्वासातून स्वतःला सावरुन पुनः तटस्थ उभं राहून जगायला...पुन्हा नवीन उमेदीने जगायला आणि स्व विश्वासाने स्वबळावर काहीतरी मिळवायला...
स्वतः वर विश्वास ठेवा....अतूट असा...हवं ते नक्कीच मिळवाल आणि दुसऱ्याचा ही विश्वास जपा...तसाच...म्हणजे नाती ही जपली जातील....ओळखीची अन् अनोळखी ही... अजुन काय हवं आयुष्य जगताना....
धन्यवाद...,☺️🙏
- ✍️©लेखन - Sayali S M
© Copyright policy
Surekh vicharanchi mandani ❤️💯
उत्तर द्याहटवाThank you ☺️
हटवाTrust ha ek najuk dhaga ahe.. Ayushya bhar manse jodun thevto.
उत्तर द्याहटवाNice writing✍️ ✌👌
Thank you ☺️
हटवाMastach Chan khup mothi gosht agadi sahaj samjavun sangitlis
उत्तर द्याहटवाDhanywad 😊🙏
हटवाउत्कृष्ट ब्लॉग आहे तुझा खूप चांगले स्पष्टपणे सांगितल आहे तू विश्वास या गोष्टी बद्दल..👌👌
उत्तर द्याहटवाDhanywad 😊🙏
हटवाखरंच आहे विश्वास हा अतूट असायलाच पहिजे. तरच कोणत्याही नात्याला अर्थ प्राप्त होतो. विश्वास नसेल तर सगळच निरर्थक.
उत्तर द्याहटवाअगदीच💯
हटवा