वाचन लेखन आणि बरंच काही.....
वाचन , लेखन आणि बरंच काही.... #spirituality #life#reading #writing #जगणं
वाचणाऱ्याला (अर्थात वाचकाला) एखादं पात्र आपल्याशी मिळतं जुळत वाटावं..,
त्याला जे सांगायचंय तेच
आपल्या प्रश्नाचं उत्तर असावं का..?
इतकं साम्य आणि तारतम्य कसं काय?
मनात प्रश्नांनी कल्लोळ माजवावा आणि उत्तर मिळावं...,
इतकं सोप्पं?...
मनात शंका यावी अन् त्याचं निरसन व्हावं,
कधी कधी हे आपल्याशीच घडतं याचच अचरज..,
काही सांकेतिक भाषेतून आपल्याशी संवाद व्हावा ,एक अशी शक्ती जी तुम्हाला ध्येयापर्यंत जाण्यासाठी मार्गदर्शन करते... खरंच असं असावं?
....किती उशीर हे सगळं समजायला?....पण सगळ्यांच्या येत का हे ध्यानी?.....असावं बहुदा किंवा नसेल ही... प्रत्येकामध्ये काही अंतरिक शक्ती असते...,स्वतच्या intution ने स्वतः सोबत इतरांना ही guidence मिळायलाच हवा हाच हेतू असावा नियतीचा त्यामागे....
आयुष्याच्या या प्रवासात किती गोष्टी सोडाव्या लागतात किंबहुना लोक ही...काही आपण cut off करतो काही नियती...तर कधी भरभरून देते ही...गोष्टी आणि आपलं हित जपणारी लोक ही...
अजुन किती तरी मैल जायचंय..,काही गोष्टी अदृश्य असून कसं काय संवाद साधत असतील?
मनात यावं अन् ते व्हावं?
दिसत नाही म्हणून सगळंच असत्य थोडीच म्हणता येत?
कधी कधी ते विचारांपलीकडचं असतं तर कधी समजण्या पलीकडचं....
सामान्य माणसाचा रोजचं जगण्याचा खटाटोप....
बाकी सगळं त्याच्यासाठी भाकड कल्पना
असंच असेल का???
नको नको यात खूप खोलवर जायला नकोच आपण,आपण काय महाज्ञानी नाही...
सगळेच पामर आपण काय ते....पण जितकं समजतं ते खूपच म्हणायचं, .....
पण मुळात रोजच जगणं आणि हे सगळं वेगळं कुठाय?...जीवनाचाच एक भाग आहे ना..?
पण भुकेचे चटके रोज बसणाऱ्याला भाकरीची चव जास्त असते....हे तत्त्वज्ञान तिथे काय कामी ?
मूलभूत गरजा तरी पूर्ण हव्यात ना...परंतु ज्यांना सक्षम बनवलं आहे त्यांनी थोडाफार हातभार लावला तर कुठं बिघडतं?अर्थात हा पण ज्याचा त्याचा प्रश्न.,
आपण काय करू शकतो इतकंच आपल्या हातात....आणि करायलाच हवं....नाहीतर मनुष्य जन्माला येऊन काय तो उपयोग?...
स्वतःच ध्येय गाठता यायला हवं मग हे सगळं....
जमलं तर या प्रवासात दिशा दर्शकाचं काम करायचं... आपल्याला जे नाही भेटलं ते इतरांना वेळेवर भेटावं इतकंच हेतू त्यामागे...
शिवाय ते म्हणतात ना एखाद्या
गोष्टीसाठी तुम्ही मनापासून प्रामाणिकपणे,
सगळं झोकून देऊन प्रयत्न करत असाल तर पूर्ण Universe तुम्हाला मदत करतं असंच काहीसं असावं...
Spirituality आणि Reality ची सांगड घालता येईल असं मनात येतं... तसं पाहता हे जमतं ही.....
काहींना हे हास्यास्पद वाटेल......पण खरचं....,
कधी कधी गुंता नसतोच (ना विचारांचा, ना नात्यांचा ,ना पडलेल्या प्रश्नांचा) ,
पण तरी तो आपल्या अतिविचारांनी होतो.,
आणि मग आपण सोप्पं ते किती अवघड केलेलं हे उमगतं....,
असंच मनात आलं आणि वाटलं.,
काही अंशी काही गोष्टी आपल्या हातात नसतात आणि काही असतात ही....
मग ज्या नाहीत आपल्या हातात त्या नसणाऱ्या गोष्टींचं अप्रुप किंवा दुःख का असावं...?
जे आपल्या हातात आहे ते करण्याचं आणि हवं ते मिळवण्याचं ध्येय असावं ना...
काहींना हे philosophical वाटेल..,
पण विचार करता समजतं ..,सगळ्यांनाच
ही संधी भेटते का?अन् भेटलीच तर कितीजण त्या संधीचं सोनं करतात..?
असं ही आयुष्य ते कितीसं?
जगाची रीत म्हणून जगायच???
की त्यासोबत जी स्वप्न आहेत
ती वास्तवात आणायची? हे आपल्याच हाती...
म्हणूनच ..,
स्वप्न पूर्ण करायची जिद्द नक्कीच आपल्यात असावी...
जे घडून गेलंय त्यावर विचार करून काय होणारेय?
काय घडवायचंय किंवा आयुष्यात काय गाठायचंय ,
हे कळलं की मग तिथपर्यंत पोहचणं
थोड सोप्पं होतं असावं,
एकदा मार्ग समजला की भरकटण होतं नसावं ,
असंच म्हणावं लागेल....
#जगणं #अध्यात्मिकरहस्य
धन्यवाद....,☺️🙏
©लेखन -✍️Sayali S M
खुप छान 👌👌👌👌👌
उत्तर द्याहटवाThank you 😊
हटवाखूपच छान 👌👌👌✍️
उत्तर द्याहटवाThank you so much ☺️
हटवा