जातीयवाद आणि आपण....पुरोगामी?आपण?Castism and our society

सुशिक्षित असून ही अडणीपणाने वागणारे आपण..... आपलं कुटूंब अन् आपला समाज....जाती आपल्यासाठी की आपण जातीसाठी?..हाच मुळी मोठा प्रश्न मनाला भेडसावतोआहे आता...एकजुटीने राहण्यासाठी आपल्यातल्या जातीयवादाच्या दऱ्या मिटण्या साठी महापुरुषांनी आपल्या जीवाची बाजी लावली.....अन् आपण आज काय करत आहोत?

इथे प्रत्येकाला आपली जात धर्म पंथ प्यारे आहेत...अर्थात असायलाच हवेत पण इतरांच्या जाती धर्माला कमी लेखून नाही...आपण एकीने राहावं यासाठी थोर महात्मे एकीने लढले लेखन केले, का तर लोकांनी समाजप्रबोधनातून तरी एक यावं..देशप्रेमाची स्वातंत्र्य तेची भावना आणि बीजे पेरली का तर एकीने लढू आणि स्वतंत्र भारत निर्माण करू...पण आम्ही आज काय करतोय??अहो जाती शिवाय तर आमचं लग्न ही होत नाही...आणि तुम्ही एकीच्या गोष्टी कुठून करताय..सगळ्यांना सगळं समजत...सगळे उच्चशिक्षित आहोत आम्ही आता आम्हला नका शिकवू...काय करायचं ते....हे सर्रास वापरले जाणारे शब्द ...जाती-जाती मध्ये आम्ही अजुन ही उच्च-नीच मानतो आणि सगळे भारतीय समान आहोत हे तोंडाने म्हणतो...तसं आम्ही direct नाही बोलून दाखवत पण मनात मात्र हेच असतं म्हणून तर आज ही आम्ही आंतरधर्मीय तर खूप दूर पण आंतरजातीय विवाहाला विरोध करतो अन् त्यात कमीपणा मानतो ना...अर्थात काही बोटावर मोजण्याइतके लोक आहेत जे मनाने विचारांनी पुढारलेले आहेत...अन् ते इतकं narrow minded नाही विचार करत....हे ही तितकंच खरं आहे आणि कौतुकास्पद ही...मला तर आपल्या थोर विचारवंत आणि त्यांनी केलेल्या कार्याचं कौतुकच वाटतं....त्या काळी त्यांनी स्त्री शिक्षण बालविवाह बंदी सती प्रथा वि धवा पुनर्विवाह हुंडा बंदी याबरोबरच अस्पृश्यता निवारण आणि जातीपाती मधला भेद बाजूला सारून आपण सारे एक आहोत याची बीजे रोवली...आणि काही वर्षांनी आज काय सुरू आहे? तेच पण स्वरूप जरा वेगळं आहे हा...म्हणजे तोंडाने म्हणायचं आम्ही पुढारलेले पण मनात मात्र एकमेकांच्या जाती धर्मा बद्दल कलुशितपणा...माफ करा थोड कठोर बोलतेय,लिहतेय पण काय करू ज्यांनी इतक्या कष्टांनी हे सगळं जातीयवादाची दरी मिटवण्यासाठी जिवाचं रान केलं मग आज अस बघताना वाईट वाटत...माणसाला कोणत्या गोष्टीचा अहं झालय माहिती नाही...माणूस म्हणून जगताना तो माणसासारख जगायचं विसरलाय?बहुतेक...कालची न्यूज वाचली p v sindhu नी कांस्य पदक मिळवलं(1Aug , टोकियो Olympic) तर काही लोकांनी तिची achievement Search करायचं राहिलं बाजूला p v sindhu's caste search केलेलं Google ला दाखव लं ....माहिती नाही आपण सुधरलोय ?की अजुन अधोगामीच आहोत?? हीच सध्य स्थिती आहे...जातीयवादाच्या दऱ्या दिवसेंदिवस वाढतच चालल्या आहेत...प्रश्न फक्त आपल्या आपल्या कुटुंबापुरता नाहीये....तशी मग किती तरी आंतरजातीय आणि आंतरधर्मीय विवाह सोहळे होताना दिसत आहेत परंतु प्रश्न समाजाचा आणि त्या व्यक्तीच्या विकासाचा ही आहेना....एखाद्या filmstar नी केलं तर त्यांचं वेगळं आहे चालतं त्यांच्यात....मध्यमवर्गीय कुटुंबातील कुणी केलं तर त्यांचे संस्कार काढतात...अन् हे ज्यांचे बुरसटलेले विचार आहेत त्यांचं काय???माणूस म्हणून जगताना घटनेने आपल्या सळ्यांनाच व्यक्ती स्वातंत्र्य धर्माचं जातीच सगळ्याच बाबतीत स्वातंत्र्य आणि संरक्षण ही दिलेलं आहे ना मग ती समानता माणसाच्या मनात का नाही? आपल्या जाती धर्म यांचा अभिमान आदर असावा यात काहीच गैर नाही....गैर आहे ते इतरांच्यात आणि आपल्यात जातीयवादाची दरी करणे....

असो माझा हा लेख यामुळे दहा पैकी एकाच्या जरी मनावर आणि वागण्यात बदल झाला तरी मला यातच धन्यता आहे...माणूस म्हणून जगूया....आयुष्य ते कितीस आहे....सगळ्यांना सोबत घेऊन जगूया.... सगळ्यांना समान वागणूक तर देतोच आपण पण मनातून एकमेकांस जोडून राहूया....

या मातीची शान आणि महापुरुषांचा वारसा पुढे नेऊया.....खऱ्या अर्थाने पुरोगामी होऊया....इतकचं सांगायचं आहे...

धन्यवाद,

जय हिंद जय महाराष्ट्र 🙏


लेखन -✍️© Sayali S M



टिप्पण्या

  1. हो अगदी बरोबर आहे. अजून खुप लोक असेच विचार करतात 🙄.
    छान👏✊👍 लिहले आहेस...

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

ही वेबसाईट कोणत्याही विषयावर,जाती लिंग वर्ण धर्म पंथ अथवा व्यक्ती यावर आक्रमक पवित्रा घेऊन टीका टिप्पणी करण्यासाठी नाही....इथे आपले विचार स्पष्टपणे अन् तार्किक पद्धतीने मांडले जातात (संविधान अनुच्छेद १९(१)) ....सारासार विचार करून आपल्या जीवनात काही चांगला प्रभाव पडत असेल तर उत्तमच...ही खाजगी ब्लॉग साइट आहे याची नोंद घ्यावी इथे कोणतीही स्पॅम comments करु नये धन्यवाद 🙏