कुछ तो लोग कहेंगे.... भूतकाळातल्या काही चुका जेव्हा वर्तमान काळात डोकावतात..अन् त्याला सामना करायला मी आज खंबीर आहे पण मी असं केलं वागलो/वागले तर लोक काय म्हणतील?काहीतरी वेगळं करायचं आहे मग लोक काय म्हणतील?प्रत्येकाच्या मनात असे अनेक प्रश्न येतात अन् जे काही करायचं ते राहून जात...कोण लोक?? काय बोलणार आहेत तुम्हाला? मान्य आहे आपण ज्या समाजात राहतो वावरतो तिथं काही गोष्टींचं भान ठेऊन वागणं बोलणं गरजेचं आहे आपल्यासाठी अन् समजासाठी ही..परंतु ज्यावेळी तुमच्या स्वतःच्या आयुष्यासाठी,Career चा निर्णय घेण्यात (जॉब करण्यात अगदी लग्न करण्यात ही )लोक काय म्हणतील याच विचार करायचा?का?आपली स्वप्न जबाबदारी यांना side ला करून लोकांनी आपल्याला नेहमीच चांगलं म्हणावं हा अट्टाहास का?आज जे मागे खेचणारे लोक असतील तेच उद्या तुम्ही यशवंत झाल्यावर तुमचे गुणगान गात असतात मग हा सगळा खटाटोप का?लोक काय म्हणतील म्हणून आपण एक पाऊल मागे जाणं कितपत योग्य आहे?कुणाला कमी वेळेत यश मिळतं २४-२५ मध्ये तर कुणाला ३०-३५ मध्ये अगदी ६५-७०मध्ये ही..,लोकांचं काय... successful झाला तरी luck च नाव देऊन रिकामे अन् unsucce...